त्या घटनांवर आधारित आहेत ‘हे’ हॉरर सिनेमे व सीरीज, तुम्ही एकटे पाहूच शकत नाहीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Horror films and series : जर तुम्हाला हॉरर सिनेमे आणि सीरीज बघायला आवडत असतील तर ओटीटीवरील हे सिनेमे आणि सीरीज अजिबात मिस करु नका. निर्मात्यांचा असा दावा आहे की या कथा सत्य घटनेवर आधारित आहेत. या हॉरर सिनेमे आणि सीरीज रात्री पाहिल्या तर तुम्हाला एकटं झोपता येणार नाही कारण यात इतके हॉरर आहे कि तुम्ही घाबरून जाल. असे अनेक हॉरर सिनेमे आणि वेब सिरीज आहेत ज्या पाहताना लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात. हॉररसोबत थ्रिलरचा टच असेल तर मग गोष्ट काही औरच. आज आपण या रिपोर्टमध्ये त्या हॉरर सिनेमे आणि सीरीजबद्दल सांगणार आहोत. हे ओटीटी प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे, जेणेकरून आपण ते सहज पाहू शकता.

द हॉन्टिंग ऑफ हिल हाउस

नेटफ्लिक्सवर अमेरिकन सुपरनॅचरल हॉरर वेब सीरिज ‘द हॉंटिंग ऑफ हिल हाऊस’ आहे. आयएमडीबी वर १० पैकी ८.६ रेटिंग आहे. विचित्र घटना फील होणाऱ्या ५ भावंडांची ही सीरीज आहे. ही सीरीज याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. हे शर्ली जॅक्सन यांनी लिहिले होते.

डिलीवर अस फ्रॉम एविल

हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि प्रमोशनदरम्यान काही गोष्टी सत्य घटनेवर आधारित असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र मुख्य कथा काल्पनिक आहे. हा चित्रपट बीव्हर द नाईट या पुस्तकावर आधारित आहे. नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

हॉन्टेड

नेटफ्लिक्सच्या ‘हॉन्टेड’ सीरिजचे 3 सीझन आले आहेत. ही सीरीज वेगवेगळ्या व्यक्ती आणि ग्रुप च्या कथांवर आधारित असल्याचा दावा केला जातो, परंतु असे काही कधी ऐकिवात आलेले नाही.

घोस्ट हंटर्स

घोस्ट हंटर्स सीरीजचे १६ सीझन झाले आहेत. या शोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की घोस्ट हंटर्स टीम देशातील अशा विविध ठिकाणांचे तलाशी घेते जे धोकादायक ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

द सीक्रेट ऑफ क्रिकले हॉल

‘द सीक्रेट ऑफ क्रिकले हॉल’ या पुस्तकावर आधारित ही सीरीज तयार करण्यात आली होती. पुस्तकात दोन कथा आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मुलांना कसे बाहेर काढण्यात आले आणि दुसरी कथा 1952 च्या महापुराची आहे ज्याने लिनमाउथ नष्ट केले होते.