Mahila Samman Savings Scheme : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली. हे 1 एप्रिल 2023 रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आले. या योजनेअंतर्गत कोणतीही महिला खाते उघडू शकते. या योजनेवर महिलांना ७.५ टक्के वार्षिक व्याज उपलब्ध आहेत. जे तिमाही आधारावर खात्यात जमा केले जाईल. कोणताही खातेदार वार्षिक 1000 ते 2,00,000 रुपये जमा करू शकतो. महिला सन्मान बचत पत्र योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत २ वर्षांसाठी उपलब्ध आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि सहभागी खाजगी क्षेत्रातील बँकांना MSSC खाती उघडण्यासाठी अधिकृत केले आहे. याशिवाय देशभरातील पोस्ट ऑफिसमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही खाते उघडू शकता.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना काय आहे?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांना बचतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि अधिक व्याज देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू झाली. या योजनेचा लाभ फक्त भारतीय महिलांनाच मिळतो. कोणत्याही वयोगटातील महिलांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड आणि फोटो आवश्यक कागदपत्रे आहेत. भारत सरकारची ही एकवेळ योजना आहे. मुदतपूर्ती पूर्ण झाल्यावर खात्रीशीर उत्पन्न मिळते. महिला सन्मान बचत पत्र योजनेत 2 वर्षांसाठी पैसे जमा करता येतात.
2 लाख रुपये गुंतवून तुम्हाला 2 वर्षात किती पैसे मिळतील?
तुम्ही 2 लाख गुंतवल्यास, पहिल्या तिमाहीनंतर तुम्हाला 3,750 व्याज मिळेल. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी ही रक्कम पुन्हा गुंतवल्यानंतर, तुम्हाला 3,820 रुपये व्याज मिळेल. त्यानुसार, योजना परिपक्व झाल्यावर एकूण 2,32,044 रुपये प्राप्त होतील.