IDBI Bank Loan: आयडीबीआय बँकेकडून 5 लाखापर्यंत कर्ज मिळवा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा! वाचा माहिती

Published on -

IDBI Bank Loan:- कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर किंवा मनामध्ये प्रश्न पडतो तो लागणाऱ्या गुंतवणुकीचा म्हणजेच पैशांचा हा होय. प्रत्येकाकडे स्वतःची बचत आपण आपल्या व्यवसायासाठी गुंतवणूक करू शकू इतका पैसा असतोच असे नाही. त्यामुळे आपण पैसा उभारण्यासाठी बँकांचा पर्याय निवडतो व या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.

व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा याकरिता केंद्र सरकारच्या देखील अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. त्यासोबतच बँकांकडून देखील अनेक प्रकारचे व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका वेगवेगळ्या व्याजदराने आणि त्यांच्या वेगवेगळ्या पात्रता निकषानुसार कर्ज उपलब्ध करून देत असतात.

अगदी याच पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची असलेल्या आयडीबीआय बँक देखील नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना कर्ज पुरवठा करते. म्हणजेच आयडीबीआय बँकेकडून व्यवसाय कर्ज तुम्हाला घेता येऊ शकते व स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

 आयडीबीआय बँकेकडून कोणाला मिळते कर्ज?

आयडीबीआय बँकेकडून व्यवसाय कर्ज घ्यायचे असेल तर ते स्वतःची मालकी असलेली व्यवसाय किंवा भागीदारीत व्यवसाय असेल किंवा भागीदारीत फर्म असेल त्यांना आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे स्वयरोजगार असणाऱ्या व्यक्तीला देखील व्यक्तिगत स्वरूपात व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

जर यामध्ये आयडीबीआय बँकेचे व्यवसाय कर्जाचा विचार केला तर याचा व्याजदर हा तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार किती कर्ज लागते त्यानुसार ठरवला जातो.तसेच कर्जाची रक्कम ही व्यवसायाच्या गरजेनुसार दोन कोटी पर्यंत वाढवता येते. आल्या कर्जावर लागणाऱ्या प्रोसेसिंग फी अर्थात प्रक्रिया शुल्काचा विचार केला तर पाच लाखापर्यंत शून्य रुपये प्रक्रिया शुल्क लागते तर पाच लाखांपेक्षा जास्त कर्जाच्या रकमे करिता कर्ज रकमेच्या एक टक्का इतके प्रक्रिया शुल्क लागते.

 आयडीबीआय बिजनेस लोनसाठी पात्रता निकष

आयडीबीआय बँकेची कडून बिजनेस लोन घ्यायचे असेल तर अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच तीन वर्ष मागील व्यवसाय असावा व या व्यवसायाची उलाढाल 30 लाख ते एक कोटी पर्यंत असावी.

 आयडीबीआय बिजनेस लोनसाठी लागणारी कागदपत्रे

व्यावसायिक लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराला काही कागदपत्रे सादर करावे लागतात. या कागदपत्रांमध्ये महत्त्वाचे म्हणजे आयडी पुरावा म्हणून पॅन कार्ड /आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स / मतदान ओळखपत्र आणि पासपोर्ट, पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार कार्ड आणि पासपोर्ट,  मालक/ फर्म/ कंपनीचे पॅन कार्ड, आयटीआर गेल्या दोन वर्षापासून, सर्व अर्जदार / सह अर्जदार / जामीनदारांचे पॅन कार्ड/ फॉर्म 60, ऑडिट अहवाल,

व्यवसाय स्थापन प्रमाणपत्र / जीएसटी प्रमाणपत्र / सेवा कर प्रमाणपत्र, नफा आणि तोटा ताळेबंद किंवा तपशील, मंजूर प्राप्तिकर रिटर्न, संबंधित व्यवसायाकडे कोणतेही चालू स्थितीत कर्ज थकबाकी असल्यास परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड  सत्यापित करण्याकरिता कर्जमंजुरी पत्र आणि बँक स्टेटमेंट देखील आवश्यक असते. तसेच कंपनीच्या लेटरहेडवर प्रकल्प अहवाल किंवा तुमच्या व्यवसायाची प्रोफाईल असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा आणि सध्याची केवायसी निकषानुसार पत्त्याचा पुरावा आणि प्रक्रिया शुल्काचा धनादेश इत्यादी कागदपत्रे लागतात.

 आयडीबीआय बँकेच्या व्यवसाय कर्जाचे फायदे

1- आकर्षक व्याजदर आयडीबीआय बँक 12.25 टक्के व्याजदर आकारते व यातून कोणीही सहजपणे कर्जाची परतफेड करू शकते.

2- ताबडतोब कर्जाचे हस्तांतरण या बँकेमध्ये कर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभपणे पार पाडली जाते व सहजपणे तुम्हाला कर्ज मिळू शकते.

3- मिळणारी कर्जाची रक्कम तुम्हाला आयडीबीआय व्यवसाय कर्जाच्या माध्यमातून पाच लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

4- तारणमुक्त कर्ज आयडीबीआय बँकेच्या कर्ज योजनेचा विचार केला तर हे व्यवसाय लोन तुम्हाला संपूर्णपणे कुठल्याही तारणाशिवाय किंवा हमीदाराशिवाय मिळते.

 आयडीबीआय व्यवसाय कर्ज योजना( आयडीबीआय मुद्रा कर्ज योजना)

या योजनेअंतर्गत सर्व छोटे उद्योग आणि बिगर कृषी कार्यात गुंतलेल्या व्यक्ती या कर्ज योजनेसाठी पात्र असून यामध्ये ओव्हरड्राफ्ट, क्रेडिट कार्ड आणि मुदत कर्ज इत्यादी सुविधा दिल्या जातात. आयडीबीआय बँकेच्या या मुद्रा कर्ज योजनेतून तुम्ही पन्नास हजार ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात.

या कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत आहे. ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिट कार्ड मर्यादेच्या बाबतीत कर्जाचा कालावधी 12 महिने आहे. या कर्जासाठी पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क लागत नाही.परंतु पाच लाखाच्या वर कर्ज रक्कम असेल तर 0.50% प्रक्रिया शुल्क बॅंकेकडून आकारले जाते.

अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आयडीबीआय बँकेकडून पात्रता पूर्ण करत असाल तर ताबडतोब व्यावसायिक कर्ज अर्थात बिजनेस लोन घेऊ शकतात व तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News