अहमदनगर ब्रेकिंग : लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींवर लोखंडी रॉडने हल्ला, पत्नीचा आक्रोश

Ahmednagarlive24
Published:

शिक्षक व लेखक असणारे नामवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. कुलकर्णी हे अहमदनगर शहरात शिक्षक म्ह्णून कार्यरत आहेत. ते शाळेतून घरी परतत असताना दोघा तिघांनी त्यांना लोखंडी रॉडनं मारहाण केली. दरम्यान या घटनेला 48 तास उलटले आहेत तरी आरोपीना अटक करण्यात आलेली नाही असा आरोप त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केला.

हेरंब कुलकर्णी हे शनिवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मित्राच्या गाडीवरून शाळेतून घरी येत होते. ते रासने नगरमध्ये जोशी क्लासेसजवळ आले असता तीन तरुणांनी गाडी अडवली.

त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारले. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. घटनेनंतर हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी तोफखाना पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने पाय, हात, पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारले.

हल्ल्यात ते जखमी झाले असून डोक्याला 4 टाके पडले असल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ सिव्हील हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले.

फेसबुक पोस्टद्वारे प्रतिमा कुलकर्णी यांचा आक्रोश
दरम्यान, हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही घटना शनिवारी घडली. पोलिसांनी कारवाई केलेली नाही. अद्याप सीसीटीव्ही फुटेजचे देखील फॉलोअप घेतलेलं नाही.

एका सामाजिक कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून त्याच्यावर रॉडने हल्ला करणे अत्यंत त्रासदायक आहे. आपण सर्वांनी शासनाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले पाहिजे असे त्यांनी म्हटलंय.

अवैध धंद्याची किनार ?
या हल्ल्यास अवैध धंद्याची किनार असल्याचं बोललं जात आहे. शाळा परीसरात गुटखा, तंबाखू आदी विकू नये असा पवित्रा कुलकर्णी यांनी घेतला होता. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe