Multibagger Stock : पैसे छापण्याची मशीन बनला ‘हा’ शेअर; 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट !

Published on -

Multibagger Stock : जर तुम्ही सध्या स्टॉक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी उत्तम स्टॉकची माहिती घेऊन आलो आहोत. गेल्या काही महिन्यांत खळबळ उडवून देणाऱ्या शेअर्समध्ये सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकचाही समावेश आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांसाठी पैसे छापण्याचे मशीन बनला आहे.

येथे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पैशात गेल्या सहा महिन्यांत तीनपट वाढ झाली आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे शुक्रवारी, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सने इंट्राडेमध्ये 29.80 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. संध्याकाळी तो किंचित घसरून 29.25 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. दरम्यान या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सुझलॉन एनर्जी ही पवन ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. त्याची सुरुवात तुलसी तांतीने केली. 2022 मध्ये त्यांचे निधन झाले. तांतीला ‘विंड मॅन ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखले जाते. या शेअरमध्ये गेल्या एका आठवड्यात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

13 ऑक्टोबर 2022 रोजी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 6.60 रुपये होते. यानंतर स्टॉक टॉप गियरला लागला आणि आत्तापर्यंत तो 341 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. आता या शेअरने 8 वर्षांचा उच्चांकही ओलांडला आहे.

सहा महिन्यांत तिप्पट पैसे

सुझलॉन एनर्जीचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत 263 टक्क्यांनी वाढले आहेत. 10 ऑक्टोबर रोजी हा शेअर 8.05 रुपयांवर व्यवहार करत होता. आता तो 29.80 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ सहा महिन्यांच्या कालावधीत सुझलॉन एनर्जीच्या शेअरच्या किमतीत तीन पटीने वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर २१.६२ टक्क्यांनी वाढला आहे. 2023 मध्ये आतापर्यंत या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये झालेली ही मोठी वाढ पाहता तज्ज्ञांचा अंदाज सकारात्मक आहे. LKP सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रुपक डे यांनी सुझलॉन एनर्जीला ‘बाय’ श्रेणीत ठेवले आहे आणि त्याची लक्ष्य किंमत 30-32 रुपये ठेवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News