पारनेर तालुक्यात शिरला कोरोना, त्या तरुणाच्या मृत्यूमुळे भितीचे वातावरण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील ‘त्या’ मृत व्यक्तीचा चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पारनेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे,यामुळे तालुका हादरला असून नागरिकांत भितीचे वातावरण आहे.

दरम्यान प्रशासनाच्या वतीने पिंपरी जलसेन गाव सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत काल दि. १२ रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सकाळी जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्या युवकाचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर मृताच्या घशाचे स्त्राव तपासणी नमुने घेतले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रशासनाने पुढील उपाययोजना म्हणून गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून पुढील उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दहा दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्यास असणारा हा निघोज येथील युवक मुंबईत त्रास सुरू झाला म्हणून पारनेर तालुक्यातील पिंप्रीजलसेन येथील सासुरवाडीत मुलगा मुलगी व पत्नीसहीत मुक्कामी आला होता.

प्रशासनाने संपूर्ण कुटुंब जि. प. शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले. तरूणास काही दिवसांनंतर श्वसनाचा त्रास सुरू झाला. परंतु विलगीकरण कक्षाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा तरूण निघोज येथे डॉक्टर असलेल्या भावाकडे एकटाच गेला.

लक्षणे संशयास्पद आढळल्याने त्या डॉक्टरने तरूणास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. निघोज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्मिता म्हस्के यांनी त्यास नगर येथे जिल्हा रूग्णालयात जाण्यास सांगितले.

त्यांनीच १०८ रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तरूणाने स्वतः नगर येथे जाऊन उपचार घेतो, असे सांगत तो पुन्हा पिंपरी जलसेन येथे आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्रास झाल्याने त्यास नगरला नेण्यात येत होते. मात्र, प्रवासात त्याचा मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment