आ. शिवाजी कर्डिलेंना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- लोकसभा निवडणुका पार पडताच शिवसेना – भाजप व महाआघाडी नेत्यांत श्रेयावाद रंगला आहे,आणि आमदार शिवाजीराव कर्डिले या वादाचे केद्रबिंदू आहेत. 

खासदार डॉ. सुजय विखे यांना भाजपात येण्याची ऑफर देतानाच त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आ. शिवाजीराव कर्डिले यांना डॉ. विखे यांच्या विजयाचे श्रेय मिळू नये

म्हणून कर्डिले विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच कर्डिलेंना बदनाम करण्याचा डाव होताना दिसत असल्याची चर्चा आ. कर्डिले समर्थकांमध्ये सुरु आहे.

सुरुवातीला विखेंना भाजपात नकोच म्हणारे राजकीय परिस्थिती बदलताच विखेंचे झाले. विखेंचा मुंबईत झालेला भाजपा प्रवेश आ. कर्डिले तेथे पोहचल्यानंतरच झाला. 

दक्षिणेतून तुम्ही माझ्या विरोधात उभे राहू नका हे विखेंनी केलेले आवाहन कर्डिले यांनी मान्य केले. विखे -कर्डिले यांची जवळीक अनेकांच्या डोळयांत खुपत असून, 

विखे-कर्डिले एकत्र आले तर आपलं काय, असा राजकीय गैरसमज अनेकांनी करून घेतला, त्यामुळे या दोघांत फूट पाडण्यासाठी निमित्त ठरले आ. संग्राम जगताप यांच्या उमेदवारीचे.

वास्तविक पाहता विखेंच्या भाजप प्रवेशानंतर जगताप पिता-पुत्रांनी उमेदवारी करू नये, असे आ. कर्डिलेंना वाटत होते; 

परंतू तरीही जगताप विरोधी गटाकडून निवडणूक रिंगणात उतरले आणि तेथून पुढे कर्डिलेंच्या अडचणी वाढल्या. त्यात भर घालण्याचे काम त्यांच्या राजकीय विरोधकांनी केले.

 नात्यागोत्याच्या राजकराणामुळे त्यात आणखी भर पडली. समोर जावई उभा असतानादेखील पक्ष आणि श्रेष्ठींना दिलेला शब्द पाळण्याचे काम आ. कर्डिले यांनी सुरुवातीपासून केले. 

मतदारसंघातील गावागावांत फिरून डॉ. विखेंना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन आ. कर्डिले यांनी केले. कर्डिले कुठेच सापडत नाहीत

म्हणून निवडणुकीच्या आदल्या दिवशी आ. कर्डिले यांनी डॉ. विखे यांच्या विरोधात मतदान करण्याचे कार्यकर्त्यांना सांगितल्याची आवई कर्डिले विरोधकांनी उठवली. 

File Photo

तरीही राहुरी-नगर-पाथर्डी तालुक्यात डॉ. विखेंना मोठे मताधिक्य मिळाले, त्याचे श्रेय कर्डिलेंना देण्याऐवजी कर्डिले विरोधकांनी तनपुरेंना देण्याचा प्रयत्न केला. 

राजकारणात आ. कर्डिले आपल्याला भारी पडत असल्याने कर्डिले यांचे विरोधक आता दिशाभुल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची चर्चा आ. कर्डिले समर्थकांमध्ये सुरु आहे

राहुरी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांचा समावेश असून, या सर्व गावांमध्ये भाजप-शिवसेना मित्रपक्षांचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनाच मोठे मताधिक्य मिळाले असून,

 आम्हाला मतदानाच्या आदल्या दिवशी विखे सोडून इतर कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश कोणत्याही नेत्याने दिलेले नाहीत.

 काही लोक अफवा पसरून प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकत्यांर्ना संशयाच्या कठड्यात उभे करण्याचे काम कर्डिले विरोधकांनी केले. मात्र, त्यामध्ये आजिबात तथ्य नाही. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment