अहमदनगर मनमाड महामार्गावर नव्याने बांधलेला भुयारी मार्ग नागरिकांना सुरू !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मागणीची दखल घेत प्राधिकरणाने तातडीने जुनी गंगा देवी मंदिर उड्डाण पुल ह्या दोघांच्या मधील भुयारी मार्गांची दुरुस्ती व मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित सुरू केला आहे.

यामुळे भाविकातून समाधन व्यक्त होत आहे. येथील नगर-मनमाड राष्ट्रीय महामागांवरील जनार्दन स्वामी मंदिर व जुनी गंगा देवी मंदिर उड्डाण पुल ह्या दोघांच्या मध्ये भुयारी मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी पूर्ण केले असून नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी भुयारी मार्ग खूला करावा,

अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्राधिकरण व नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. याबाबत कोल्हे म्हणाल्या होत्या की, नगर-मनमाड महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे महामार्गावरून पायी तसेच वाहनांवरून ये-जा करणे भाविक भक्त व नागरिकांना धोकादायक ठरते.

या महामार्गावर अनेक लहान-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे कोपरगाव शहर, बेट व परिसरातील नागरिकांना व भाविक भक्तांना राष्ट्रसंत सदगुरू श्री जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर, श्री काशीविश्वनाथ मंदिर व श्री जुनी गंगा जगदंबा देवी मंदिर या ठिकाणी सुलभरीत्या ये-जा करण्यासाठी या धार्मिक स्थळांजवळ नगर- मनमाड महामार्गावर नव्याने अंडर पास बांधला आहे.

येत्या १५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरासमोर नवरात्रोत्सव काळात नऊ दिवस मोठ्या प्रमाणात भाविक घटी बसतात. नवरात्रोत्सव काळात श्री जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविक-भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

हे लक्षात घेता नगर-मनमाड महामार्गावर नव्याने बांधलेला येथील भुयारी मार्ग नागरिकांना सुरू करावा जेणेकरून वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी येण्यासाठी कसरत करावी लागणार नाही, असे कोल्हे यांनी प्राधिकरण व नगरपालिका यांना केलेल्या यांच्याकडे केलेल्या मागणी केली होती.

याची दखल घेत प्राधिकरणाने तातडीने या भुयारी मार्गाची दुरुस्ती व मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित सुरू केला आहे. यामुळे भाविकातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आता नगरपालिका मुख्याधिकारी यांनी मोहिनीराज नगर मार्गावरील झुडपे काटे, साफसफाई व पथ दिव्यांची व्यवस्था तातडीने करून द्यावी, यामुळे भाविकातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe