अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास ‘हॉटस्पॉट’ करावे लागतील !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- शहरातील कोरोनाला पुन्हा आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिलाने काम करायला हवे. यासाठी चार टिम तयार करण्यात येणार आहेत.

या कामात कुचराई करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

शहरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आयुक्‍त यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीला उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस.बी. तडवी, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे,

यंत्र अभियंता परिमल निकम, नगररचनाकार राम चारठणकर, कर निरिक्षक अशोक साबळे, आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख शंकर मिसाळ आदी उपस्थित होते.

आयुक्‍त मायकलवार म्हणाले, शहरातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्‍न सोडविण्या बरोबरच नागरिकांच्या आरोग्य प्रश्‍नांनाही महत्त्व द्यायला हवे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मुकुंदनगरमध्ये महापालिकेने यशस्वीपणे कोरोना अटोक्‍यात आणला होता. त्या अनुभवांचा उपयोग आता होणार आहे. शहरात महापालिकेचे मोजकेच लोक काम करतात.

महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची दृष्टी नकारात्मक आहे. महापालिकेकडे काम करण्यासाठी एकच टिम तयार आहे. सर्वांनी एक दिलाने काम करण्याची गरज आहे.

महापालिकेतील दैनंदिन काम करतानाच कोरोना विषयकही काम करावे. नागरिकांना त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मदत करावी. नागरी समस्या सकारात्मकपणे जाणून घ्याव्यात.

भविष्यात नगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास काही परिसर ‘हॉटस्पॉट’ करावे लागतील. त्यावेळी मुकुंदनगर प्रमाणे पूर्ण क्षमतेने काम करा.

आजपासून महापालिकेची यंत्रणा कोरोनासाठी सज्ज करा. यंत्रणा कोलमडू नये यासाठी प्रयत्न करा. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी आरोग्य तपासण्या होतील, असे आयुक्‍त मायकलवार यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment