Snake Information: गाईला जर साप चावला तर अशा पद्धतीने ओळखा! हे उपाय ठरतील फायद्याचे

Published on -

Snake Information:- सर्पदंशाचा धोका जसा मनुष्याला असतो तसा पाळीव प्राण्यांना देखील असतो. बऱ्याचदा  ज्या ठिकाणी गाय किंवा म्हशी बांधलेले असतात अशा गोठ्यामध्ये गोठ्याच्या अवतीभवती जर अस्वच्छता असेल किंवा गवत वाढले असेल तर अशा ठिकाणी साप आडोसा घेऊन राहण्याची शक्यता असते.

त्यामुळे बऱ्याचदा जनावरांना सर्पदंश होतो. यामध्ये बर्‍याचदा जनावरांच्या पायाला किंवा तोंडाला व मानेवर सर्पदंश होण्याची शक्यता जास्त असते. जर वेळेमध्ये सापाने चावा घेतल्याच्या खुणा जर लक्षात आले नाही तर जनावरांच्या मज्जा संस्थेवर याचा परिणाम होऊन जनावरांची श्वसनक्रिया बंद होण्याची शक्यता असते व जनावर दगावू शकते.

 या घटकांवर ठरते सर्पदंशाची तीव्रता

1- सापांचा आकार यामध्ये सापाचा आकार जर मोठा असेल तर जनावरांच्या शरीरामध्ये वीष पसरण्याची शक्यता किंवा क्षमता जास्त असते.

2- किती वेळा साप चावला?- जेव्हा जनावरांना किंवा गाईला पहिल्यांदा साप चावतो तर त्याची तीव्रता जास्त असते व त्यानंतरचे जे काही सापाकडून चावा घेतला जातो त्याची दाहकता कमी असते.

3- जनावरांचा प्रकार साप चावण्याची किंवा विष पसरण्याची तीव्रता ही प्राण्यांच्या प्रकारावर देखील ठरते. उदाहरणच घ्यायचे झाले तर शेळीमध्ये गाय किंवा म्हशी पेक्षा सर्पदंश पसरण्याचे प्रमाण जास्त असते.शेळी आकाराने लहान असल्यामुळे साप जर चावला तर लवकर विष शरीरात पसरते.

4- जनावरांचे वय तरुण जनावरांच्या तुलनेमध्ये वयस्कर असलेल्या जनावरांमध्ये विष कमी कालावधीत पसरते.

5- चावा घेतल्याची जागा सापाने गाय किंवा म्हशीला किंवा इतर जनावरांना ज्या ठिकाणी चावा घेतला आहे ती जागा हृदय आणि मेंदूच्या जवळ असेल तर सर्पदंशाची परिणामकारकता जास्त असते.

 गाईला किंवा म्हशीला साप चावल्याचे निदान कसे करावे?

ज्या जनावराला सर्पदंश झालेला असतो ते जनावर अस्वस्थ आणि बैचन होते व एकसारखे डोके हलवत राहते तसेच पाय देखील झटकायला लागते व उड्या मारू लागते. जर जनावरांना विषारी साप चावला असेल तर जनावर पळत सुटते.

 गाय किंवा म्हशीला किंवा इतर जनावरांना साप चावला तर हे उपाय करावे

1- जनावरांना साप चावला आहे हे कळल्यानंतर जोपर्यंत पशुवैद्यक येत नाही तोपर्यंत जनावरांच्या शरीरात विष पसरू नये यासाठी उपाययोजना करावे.

2- याकरिता सर्वप्रथम ज्या ठिकाणी साप चावला आहे अशा ठिकाणाच्या वरील बाजूस दोरीने घट्ट बांधावे. असे केल्यामुळे शरीरामध्ये विष पसरण्यास प्रतिबंध निर्माण होतो.

3- ज्या ठिकाणी सापाने चावा घेतला आहे अशा ठिकाणी नवीन निर्जंतुक ब्लेडने कापावे किंवा काप द्यावा. परंतु काप देताना तो जास्त खोल देऊ नये.

4- अशापद्धतीने काप दिल्यास शरीरामध्ये विष न पसरता ते रक्त प्रवाहासोबत बाहेर निघून जाण्यास मदत होते.

5- जेव्हा काप दिलेल्या किंवा सापाने चावा घेतलेल्या जखमेतून पुरेसा रक्तप्रवाह झाल्यानंतर त्यावर पोटॅशियम परमॅग्नेट लावून घ्यावे. यामुळे रक्तप्रवाह आटोक्यात आणण्यास मदत होते.

अशा पद्धतीने गाय किंवा म्हशीला किंवा इतर जनावरांना साप चावला तर अशा पद्धतीने निदान करावे व काळजी घ्यावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News