Ahmednagar News : तुझा बोअर चालु झाल्यावर सामाईक बोअरला पाणी येत नाही ! भावाने केली भावाला लोखंडी पाईप आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Published on -

Ahmednagar News :- तुझा बोअर चालु झाल्यावर सामाईक बोअरला पाणी येत नाही. त्यामुळे तुझा बोअर चालु करु नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने एका भावाने दुसर्‍या भावाला लोखंडी पाईप व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्‍यातील वडनेर येथे नुकतीच घडली.

याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक विश्‍वनाथ बलमे (वय ४२, रा. वडनेर, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,

अशोक बलमे व त्यांचा भाऊ जालिंदर बलमे हे शेजारी-शेजारी राहतात. त्यांच्या शेतामध्ये दोन बोरवेल घेतलेले आहे. त्यापैकी एक बोअर सामाईक आहे. सदर बोअरचे पाणी देण्यावरुन जालिंदर बलमे व त्याची पत्नी कविता ही नेहमी वाद करत असतात.

(दि.६) ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान अशोक बलमे यांची पत्नी विद्या हिला जालींदर व त्याची पत्नी विद्या यांनी बोअरचे पाणी भरण्याचे कारणावरुन मारहाण केली होती. (दि.७) ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान जालींदर याने गावातील प्रतिष्ठीत लोकांना आमचे घरी बोलावले आणि त्यांना झालेल्या घटने संदर्भात माहिती देत होता.

जालींदर विश्‍वनाथ बलमे हा म्हणाला की, माझे शेतात दोन बोअर आहेत. त्यापैकी एक सामाईक आहे व दुसरा माझे मालकीचा आहे. तो मी वापरत असतो. त्यावेळी अशोक बलमे हे त्याला म्हणाला की,

तु दुसरा बोअर चालु केल्यामुळे आपल्या सामाईक बोअरला पाणी येत नाही. त्यामुळे मला पाणी वापरण्यास कमी पडत आहे. ‘तु तुझा बोअर चालु करु नको’ असे म्हणाल्याचा जालिंदर यास राग आल्याने तो म्हणाला की, माझे बोअर कधीही चालु करीन असे म्हणुन त्याने शिवीगाळ करुन तुला काय करायचे करुन घे, असे म्हणाला.

त्याने केलेल्या शिवीगाळ केल्यामुळे त्याची पत्नी कविता व मुलगा सार्थक हे तेथे आले व म्हणाले की, आता तुमच्याकडे ‘पाहतोच, असे म्हणुन आरोपींनी अशोक बलमे व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली. पुन्हा बोरच्या पाण्याबद्दल काही बोलला तर एक-एकाला जिवे मारुन टाकु, अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

अशोक विश्‍वनाथ बलमे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जालिंदर विश्‍वनाथ बलमे, कविता जालींदर बलमे, सार्थक जालींदर बलमे (तिघे रा. वडनेर, ता. राहुरी) या तिघांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe