Graphology: भावांनो! सहीवरून देखील ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव आणि गुणदोष, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Published on -

Graphology:- समाजामध्ये वावरत असताना आपल्याला अनेक वेगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या व्यक्ती भेटतात किंवा दिसतात. प्रत्येकाची वागण्याची तऱ्हा किंवा बोलण्याची पद्धत इथपासून ते इतर लोकांशी त्यांचे संबंध किंवा घरातील त्यांचे वागणे इत्यादी बद्दल आपल्याला बराच फरक दिसून येतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो तसेच त्यांच्यात असलेली गुण किंवा दोष देखील वेगवेगळे असतात.

बऱ्याच अंशी अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कळत असतो.परंतु बऱ्याचदा काही व्यक्ती काही गोष्टींवरून देखील समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे किंवा त्याच्यात काय गुणदोष आहेत किंवा एकंदरीत वागणूक कशी आहे हे पटकन ओळखू शकतात.

काही काही व्यक्ती पहिल्या भेटीतच समोरचा व्यक्ती कसा आहे किंवा त्याचा स्वभाव कसा आहे याची पारख करतात.परंतु एखाद्या व्यक्तीचे लिखाण म्हणजे हस्ताक्षर कसे आहे? यावरून देखील संबंधित व्यक्तीचे गुणदोष किंवा त्याच्या स्वभावाचे विश्लेषण करता येते. यालाच ग्रेफोलॉजी असे देखील म्हटले जाते.

आता सही किंवा स्वाक्षरी म्हटले म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही शासकीय महत्त्वाच्या असलेल्या कागदपत्रांवर सही किंवा स्वाक्षरी करणे गरजेचे असते. आपण बऱ्याच जणांच्या स्वाक्षऱ्या किंवा सह्या पाहतो. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्वाक्षऱ्या केल्या जातात. परंतु या स्वाक्षरीवरून देखील व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला ओळखता येतं. नेमके स्वाक्षरी वरून व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा किंवा कसा जाणून घ्यावा याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.

 सहीवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव

1- बरेच व्यक्ती जेव्हा सही करतात तेव्हा तिची दिशा ही वरच्या बाजूने किंवा वरच्या दिशेने असते. असे वरच्या दिशेने सही करणारी व्यक्ती हे जीवनात प्रचंड आशावादी असतात आणि नेहमी प्रगती करणारे असतात. परंतु या उलट जर आपण विचार केला तर खालच्या दिशेने सही करणारे व्यक्ती हे नेहमी निराशच असतात व दुःखी असल्याचे दिसून येतात.

2- तसेच ज्या व्यक्तींची सही स्पष्ट आणि सरळ असते असे व्यक्ती हे समाजामध्ये वागताना इतर व्यक्तींसोबत मिळून मिसळून राहतात. तसेच याउलट मोठ्या अक्षरांमध्ये सही करणारे लोक हे खूप अभिमानी असतात व ते नेहमी इतर लोकांना कमी लागतात व स्वतःला वेगळे समजतात.

3- आपल्याला माहिती आहे की बरेच व्यक्ती जेव्हा सही करतात तेव्हा त्यातील पहिले अक्षर मोठे काढतात व बाकीचे लहान काढतात. अशा पद्धतीने सही करणारे लोक हे स्वभावाने खूप दयाशील असतात. आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी ते खूप कष्ट घेतात व राजकारणामध्ये देखील ते उत्तम पद्धतीचे काम करू शकतात.

4- तसेच बरेच व्यक्ती सही करताना त्यातील नावाच्या पहिले अक्षर मोठे लिहितात. अशा पद्धतीने स्वाक्षरी अथवा सही करणारे व्यक्ती हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात व कायम सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. समाजामध्ये हे प्रशंसेला पात्र असतात व त्यांची नेहमी प्रशंसा होते. अशा लोकांचे कुटुंबावर खूप प्रेम असते व आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी त्यांना खूप काही कष्ट करावे लागत नाही.

अशा पद्धतीने ग्रेफोलॉजीच्या माध्यमातून स्वाक्षरीचे विश्लेषण करून तुम्ही व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News