अहमदनगर: श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवक पती पत्नीस गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना राहाता तालुक्यातील चितळी -राहाता रस्त्यावर पाटबंधारे खात्याच्या बंगल्या जवळ बुधवारी सायंकाळी घडली.
याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाऊर येथील रंजना शिंदे (खोपडी-कोपरगाव येथे कार्यरत) तर पती ग्रामसेवक मधुकर गंगाधर आग्रे (राहाता पंचायत समितीत कार्यरत)
हे दाम्पत्य आपले कर्तव्य बजावून घरी जाण्यास मोटारसायकवरून निघाले होते.
सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास चितळी राहाता रस्त्यावर पाटबंधारे खात्याच्या बंगल्या जवळ आले असता पाठीमागून दोन पल्सलवर पाठलाग करत
चार तरूणांनी त्यांना चितळी शिवारात रेल्वे स्टेशन जवळील गोडावून नजीक कट्ट्याचा धाक दाखविला.
या दाम्पत्यास मारहाण करून 39 हजार रूपये किंमतीचे मणी मंगळसूत्र, 3 ग्रॅम व 1 हजार रूपयाची रोकड या लुटारूंनी लांबविली.
याप्रकरणी रात्री उशीरा मधुकर आग्रे यांनी फिर्याद दिली. त्यावरून चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे