अहमदनगर – नगर तालुक्यात लहान मुलीशी गैरवर्तन केल्याच्या रागातून वृद्ध दलित व्यक्तीला लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी तालुक्यातील गुणवडी येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत जनावरांची छावणी व त्याच्या घरातून बाहेर ओढून या वृद्धास मारहाण झाली.

याप्रकरणी बाळू गणपत शेळके, संतोष बाबासाहेब शेळके, अमोल रमेश परभणे, संजय माणिक शेळके, संतोष माणिक शेळके, सागर राजू शेळके, रावसाहेब गणपत शेळके, गणपत शेळके,
माणिक शेळके, राजू दगडू शेळके, योगेश बबन शेळके, बबलू बाल्मीक शेळके, रमेश गणपत शेळके, महेंद्र प्रकाश शेळके, गोरख सुभाष पवार
व इतर ७० ते ८० अज्ञात व्यक्ती ( सर्व रा. गुणवडी, ता. नगर) यांच्याविरुद्ध बेकायदा जमवून दलित व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी ‘ॲट्रॅसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दुबार पेरणीचे संकट ! पाऊस लांबल्याने शेतकरी अडचणीत,आर्थिक गणितं कोलमडली
- आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार चांदा-कुकाणा रस्त्यावर दुर्दैवी अपघात
- रथयात्रेच्या दिवशी कर्जत शहरातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही !
- मोटारसायकल घसरली, कारखाली चिरडले गेले ! दोघांचा दुर्दैवी अंत…
- कोपरगावच्या रखडलेल्या विकासकामांवरून राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत घमासान!