Ahmednagar News : डांबरात फसल्याने चार शेळयांचा मृत्यू

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील सोमठाणे रोडवर डांबर असलेल्या खड्डयात पडल्याने चार शेळयांचा मृत्यू झाला तर शेळया चारणारा बचवाला.

तिसगाव येथील सोमठाणे येथील एका डांबराच्या प्लॅटजवळ एका खड्डयात डांबर साचलेले होते, त्या ठिकाणी शेतकरी शेळ्या चारत असताना त्याच्या चार शेळ्या खड्ड्यात पडल्या,

शेळ्यांना खड्डयातून बाहेर काढत असताना शेळ्या चालणारे मच्छिद्र भोसले रा. तिसगाव हे देखील या डांबरात फसले.

मात्र, त्यांनी वेळीच आरडा ओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावून आले व त्यांनी भोसले यांना या खड्डयातून सुखरूप बाहेर काढले.

मात्र, त्यांच्या चार शेळ्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. खड्डयातून बाहेर काढलेल्या शेळ्या सेवा संस्थेचे संचालक बाबासाहेब म्हातारदेव इंगळे यांच्या मालकीच्या आहे.

या घटनेमुळे तिसगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe