Bank Loan : ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सणासुदीचा हंगामही सुरू झाला आहे. या काळात बँका तसेच शॉपिंग वेबसाईटवर मोठ्या ऑफर्स पाहायला मिळत आहेत. अशातच देशातील तीन मोठ्या बँकांनी ग्राहकांना धक्का दिला आहे. या बँकांनी आपले कर्ज महाग करून ग्राहकांना ऐन सणासुदीच्या तोंडावर नाराज केले आहे.
एकीकडे अनेक बँका मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करत आहेत. तर दुसरीकडे, अनेक बँकांनी कर्जे महाग केली आहेत. त्यामुळे ईएमआयचा बोजाही वाढला आहे.

मात्र, यावेळीही रेपो दर न वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. असे असतानाही अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात बदल केले आहेत. आज आपण अशाच तीन बँकांचे MCLR दर जाणून घेणार आहोत ज्यांनी निकतेच आपले कर्जाचे दर वाढवले आहेत.
एचडीएफसी बँक
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने कर्ज महाग केले आहे. बँकेने MCLR 10 बेसिस पॉईंटने वाढला आहे. रात्रभर MCLR दर 8.55% वरून 9.25% पर्यंत वाढवले आहेत. एक महिन्याचा MCLR वाढवून 8.65% करण्यात आला आहे. तीन महिन्यांचे दर सणासुदीचे 8.85 आहेत. सहा महिन्यांसाठी MCLR 9.10%, एका वर्षासाठी 9.20% आणि 2 वर्षांसाठी 9.25% आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र
या यादीत बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने MCLR दर 10 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.1% वाढले आहेत. एका वर्षासाठी वैयक्तिक, गृह आणि कार कर्जासाठी MCLR 8.60% वरून 8.70% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेने निधीवर आधारित कर्जाच्या किरकोळ खर्चातही वाढ केली आहे. MCLR दर 0.05% वाढले आहेत. रात्रभर MCL त्रुटी 7.95% पर्यंत वाढली आहे. सध्या एका महिन्यासाठी MCLR 8.05%, तीन महिन्यांसाठी 8.15%, सहा महिन्यांसाठी 8.50% आणि एका वर्षासाठी 8.70% आहे.