SBI UPI Payment : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; UPI पेमेंट बाबत बँकेने दिले मोठे अपडेट !

Published on -

SBI UPI Payment : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना महत्वाची सूचना केली आहे. बँकेने UPI बाबत महत्वाची माहिती दिली आहे, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, बँकेने आपल्या ट्विटरवर आपल्या ग्राहकांना UPI बाबत महत्वाचे अपडेट दिले आहेत.

देशातील सर्वात मोठी बँक SBI ने एक तातडीची घोषणा करत UPI व्यवहार करताना काही अडचणी येऊ शकतात असे म्हटले आहे. याचे कारण स्पष्ट करताना बँकेने ट्विट केले की, ‘आम्ही तंत्रज्ञान अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत आहोत. अशा स्थितीत तुम्हाला कधी-कधी UPI सेवेमध्ये अडचणी येऊ शकतात. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, आम्ही तुम्हाला लवकरच पुढील अपडेट देऊ.’

बरेच वापरकर्ते अडचणीत

एसबीआयने ट्विटरवर केलेल्या घोषणेनंतर यूजर्सच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. बँकेच्या या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मी UPI पेमेंटद्वारे व्यवहार करू शकत नाही. कृपया सर्व्हर अपग्रेडेशन समस्येचे निराकरण करा, कारण आम्हाला आमच्या वैयक्तिक कामासाठी तातडीच्या व्यवहारांची आवश्यकता आहे, कृपया सर्व्हर किती तासांमध्ये पुन्हा सुरु होईल ते कळवा.’ तर काही वापरकर्त्यांनी शनिवारी तक्रार केली की दिवसभर एसबीआय ऑनलाइन आणि डिजिटल सेवांद्वारे त्यांचा छळ करत आहे. तर अनेक युजर्सनी या समस्येबद्दल आधी का सांगितले नाही. या बाबत बँकेकडे विचारणा केली आहे. SBI चे लाखो ग्राहक सकाळपासून UPI ​​द्वारे पेमेंट करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी करत आहेत.

SBI UPI Payment
SBI UPI Payment

इंटरनेट बँकिंगमध्येही समस्या?

अनेक युजर्सनी इंटरनेट बँकिंग वापरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारीही केल्या. मात्र, एसबीआयने ग्राहकांना या समस्येबाबत आधीच माहिती दिली होती. बँकेने संदेशात म्हटले होते की, नियोजित क्रियाकलापांमुळे, 14 ऑक्टोबर 2023 रोजी 00:40 ते 02:10 पर्यंत इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन सेवा उपलब्ध होणार नाही. तुमच्या माहितीसाठी UPI पेमेंट सेवेसाठी SBI खाती मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News