Maharashtra PWD Recruitment 2023 : सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सध्या विविध पदांवर बंपर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या भरती साठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पद संख्या
वरील भरती अंतर्गत एकूण २०१९ जागा भरल्या जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
अर्ज पद्धती
वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी १०००/- रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९००/- रुपये इतके शुल्क आहेत.
अर्ज सुरु होण्याची तारीख
अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वरील भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास pwd.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज http://mahapwd.com/News/Newslist/Default.htm या वेबसाईटद्वारे सादर करायचा आहे. ( अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होईल)
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर वर दिलेल्या लिंक द्वारे सादर करावे.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.
-या भरती साठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखतीची तारीख आणि ठिकाण नंतर कळवले जाईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.