आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून दोन तालुक्यांचा विजेचा प्रश्न लागणार मार्गी !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासह नगर तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती निंबळक सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी दिली.

महावितरणच्या आरडीएसएस योजनेंतर्गत पारनेर नगर मतदारसंघात सिंगल फेज डीपी व लाईनच्या कामासाठी आ. लंके यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, तब्बल ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

एकूण ३३६ डीपी मंजूर असून, नगर तालुक्यात ८० डीपी मंजूर झालेल्या आहेत. तर सिंगल फेजसाठी ७९ किलोमीटर एलटी लाईन टाकण्यात येणार आहे. तसेच थ्री फेज साठी तालुक्यात ५७ किलोमीटर लाईन टाकण्यात येणार आहे. नगर तालुक्यात एकूण १३६ किलोमीटर लाईन साठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

नगर तालुक्यात अकोळनेर, कामरगाव, सारोळा कासार, चास, विळद, गवळीवाडा, शिंगवे, जखणगाव, नेप्ती, पिंपळगाव, टाकळी खातगाव, निंबळक, अरणगाव येथे एकूण ८० डीपी मंजूर झालेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे निंबळक सरपंच प्रियंका लामखडे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe