Epfo Update: सणासुदीच्या कालावधीत पीएफ खात्यात येतील ‘इतके’ पैसे! पीएफ खात्यातील किती रकमेवर मिळेल किती व्याज? वाचा डिटेल्स

Published on -

Epfo Update:- सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असून दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण आता येऊ घातले आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बोनस किंवा महागाई भत्ता वाढीविषयीचे अनेक प्रकारचे लाभ देण्यात येतील अशी शक्यता आहे.

अशाच पद्धतीची एक महत्त्वाची बाब ही ईपीएफओ सदस्यांसाठी देखील येण्याची शक्यता असून ईएफओ सदस्यांच्या खात्यामध्ये लवकरच केंद्र सरकार व्याजाची रक्कम जमा करेल अशी शक्यता आहे. या सणासुदीच्या कालावधीमध्ये जर ही व्याजाची रक्कम जमा झाली तर नक्कीच दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

 केंद्र सरकारने व्याजदरात केली होती वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काही महिन्यांपूर्वी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र सरकारने व्याजाची रक्कम जाहीर केली होती व यावेळी ईपीएफ सदस्यांना देण्यात येणार आहे व्याजदरामध्ये 8.15 टक्क्यांनी वाढ केली होती. ही रक्कम गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक असून या व्याज दरवाढीचा फायदा देशातील सहा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मिळणार असल्याची शक्यता आहे.

आता याबाबतीत प्रश्न पडला असेल की व्याजाची रक्कम खात्यात जमा होईल परंतु किती जमा होईल याबद्दल अजून बऱ्याच जणांना माहिती नाही. या माध्यमातून पीएफ सदस्याच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा आहे यानुसार व्याजाची रक्कम जमा होणार आहे. यावेळी सरकारने 8.15% व्याज देण्याची घोषणा केली आहे व ही तीन वर्षातील सर्वोच्च रक्कम आहे.

तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होणार हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर ही आकडेवारी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. समजा खात्यामध्ये जर तीन लाख रुपये जमा असतील तर यामध्ये जवळपास 25 हजार रुपयांचे रक्कम व्याज म्हणून खात्यात ट्रान्सफर होणे शक्य आहे.

तसेच खात्यामध्ये जर चार लाख रुपये जमा असेल तर व्याजाच्या रूपात 33 हजार रुपयांचा फायदा मिळेल  व पाच लाख रुपये जर पीएफ खात्यात जमा असतील तर 42 हजार रुपये व्याजाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यावरून तुम्ही तुमच्या खात्यातील जमा रकमेवर किती व्याजाचे पैसे येतील हे तुम्हाला समजू शकेल.

खात्यामध्ये किती पैसे आले किंवा येणार आहेत हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही उमंग एप्लीकेशनच्या माध्यमातून ते तपासू शकतात. तसेच ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन देखील तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News