प्रगतशील शेतकऱ्याचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 : उक्कलगाव येथील प्रगतशील शेतकरी व अशोक कारखान्याचे शेतकी विभागाचे कर्मचारी दिपक बाबुराव थोरात (वय 48) काल उक्कलगाव मधीलच यांच्या शेताजवळून जाणाऱ्या प्रवरा नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यु झाला.

कालच ते पाच वाजता सुमारास शेतातच औषध फवारणी करत होते पाणी संपले म्हणून ते नदीपात्राकडे गेले असता पाणी घेत असतानाच त्यांचा तोल जावुन नदीत पडले

त्याठिकाणावर नदीपात्र खोल असल्याने कारणाने अन् दुर्दैवाने त्यांना पोहता येत नव्हते काही अंतरावर असणार्‍या पुतण्या राहुल याने त्यांच्या घटना लक्षात येताच त्याने पाण्यात उडी घेतली त्यालाही पोहता येत नव्हते त्यावेळीच आसपास कोणीही नव्हते त्यामुळे त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले

अश्याप्रकारे त्यांची गावातच खबर लागताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती बेलापूर पोलिस नाईक ढोकणे पोलिस भोईटे घटनास्थळी दाखल झाले होते उक्कलगाव मधील काही पोहणारे तर गळनिंब लट्टल पोहणारे तरुणाच्या मदतीने शोध मोहिम सुरू करत अवघ्या काही तासातच मृतदेह तरुणाच्या हाती लागला

कोणतेही विलंब न करताच साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला रात्री उशिराच उक्कलगाव अमरधामात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment