अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पाथर्डी पंचायत समिती सदस्यासह त्यांच्या पत्नीवर बेकायदा मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये देविदास लिंबाजी खेडकर (वय 42, पंचायत समिती सदस्य, पाथर्डी, रा:- पाथर्डी , ता: पाथर्डी, जि:- अहमदनगर), सविता देविदास खेडकर (वयः- 37, गृहिणी, रा:- पाथर्डी ता:- पाथर्डी , जि:- अहमदनगर) यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, देविदास खेडकर हे एकनाथ वाडी या गावचे ग्रा प.चे सदस्य व सरपंच तसेच पाथर्डी पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता संपादित केल्याबाबतची तक्रार झाली होती.
त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी केली. चौकशीचे दरम्यान परिक्षण कालावधी सन 2001 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत त्यांना सर्व ज्ञात कायदेशीर उत्पन्नातून मिळविलेली एकूण मालमत्ता व त्या कालावधीतील त्यांचा व त्यांचे कुटुंबियांचा एकूण उत्पन्न खर्च
यांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांनी वर नमूद परीक्षण कालावधीत सन 2011 या वर्षांमध्ये त्या वर्षी च्या एकूण उत्पन्नाचे 119% म्हणजे 12 लाख 5 हदार 445 रुपये इतकी जास्त मालमत्ता (अपसंपदा) संपादित केली आहे.
मालमत्तेचे उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच सदरची अपसंपदा संपादीत करण्याबाबत त्यांच्या पत्नीने प्रोत्साहन दिले. दोन्ही आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशन येथे आज भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com