अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवकाकडून रुग्णालय कर्मचाऱ्यास मारहाण, शहरात खळबळ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 : शेतातील पाण्याची पाईपलाइन नेण्याच्या वादातून भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह अन्य चौघांनी खासगी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली.

विशेष म्हणजे महापालिकेच्या केबिनमध्येही मारहाण करण्यात आली. यामुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. संजय परशुराम छत्तिसे (वय ४२) हे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी स्वप्नील शिंदे, भैय्या संपत गोरे यांच्यासह तीन अज्ञातांविरुद्ध पळवून नेणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महापालिकेत सभागृह नेते असलेले भाजपचे नगरसेवक शिंदे यांच्या महापालिकेतील केबिनमध्येही मारहाण झाली. फिर्यादी हा मूळचा नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावचा रहिवासी आहे.

तो साईदीप हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस आहे. रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर ड्युटी करत असताना तीन अज्ञातांनी बळजबरीने गाडीत बसवून त्याला अहमदनगर महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावर स्वप्नील शिंदे यांच्या केबिनमध्ये नेले.

तिथे शिंदे व इतरांनी छत्तिसे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भैय्या संपत गोरे याची पाईपलाईन शेतातून जाऊ दे. त्यास विरोध करू नको, नाहीतर तुझे हातपाय काढून घरी बसवू, अशी धमकीही दिली.

कार्यालयातील अन्य लोकांनाही छत्तिसे याला मारण्यासाठी चिथावणी दिली. मारहाणीनंतर छत्तिसे यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवून रुग्णालयात सोडण्यात आले.मागील आठवड्यात हा मारहाणीचा प्रकार घडला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment