Ahmednagar News : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ! अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : भरधाव वेगातील कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात खडकी ते सारोळा कासार रस्त्यावरील दरेमळा फाट्याजवळ घडली.

अखिलेशकुमार दुलारचरण राय यादव (वय ३२, मुळ रा. बिहार, हल्ली रा. सारोळा कासार, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी मयत अखिलेशकुमार राय यांचा भाऊ पंकजकुमार यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत अखिलेशकुमार हा गेल्या काही दिवसांपासून सारोळा कासार परिसरात कामाला होता. तो गावातच राहात होता. शनिवारी सायंकाळी त्याच्याकडील दुचाकीवरून खडकी ते सारोळा कासार रस्त्यावरून जात असताना

दरेमळा फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या कार चालकाने अखिलेशकुमार याला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अखिलेशकुमार याचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी माने करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe