अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळीत भ्रष्टाचार, ‘या’ सत्ताधारी आमदाराची पोलिसांत तक्रार !

Published on -

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीची विक्री करणाऱ्या केंद्रचालकांनी मोठा भ्रष्टाचार करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केला आहे.

या अर्जात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत मूळ उद्दीष्ट बाजूला ठेवून वैयक्तिक आर्थिक हित साध्य करून घेण्याचा प्रयत्न केला.

एकूण दहा ठिकाणांपैकी बहुतांशी ठिकाणी संपूर्ण संचारबंदीसारखी अवस्था असताना सोशल डिस्टन्सिंग पाळून शेकडो लोक प्रत्यक्षात जेवल्याचे प्रथमदर्शनी अशक्य आहे.

सदर सेवा पुरविणाऱ्या हॉटेल चालकांनी बोगस व खोटी माहिती पुरवून फक्त थाळ्यांची संख्या दाखवून शासनाची फसवणूक केल्याचे सिध्द होत आहे.

ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. यापूर्वी याबाबत मी संबंधित खात्याकडे तसेच माननीय मंत्री महोदयांकडे पत्रव्यवहार केलेला आहे.

सदर बाबतीत अधिक माहिती घेतली असता मोठ्याप्रमाणावर आर्थिक उलाढाल व भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. याची आपल्या शाखेमार्फत सदर प्रकरणाची अधिक चौकशी करावी, असे म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe