Mumbai Bharti 2023 : GGMC मुंबई अंतर्गत ‘या’ पदांची भरती सुरु, ऑनलाईन करा अर्ज !

Sonali Shelar
Published:
GGMC Mumbai Bharti 2023

GGMC Mumbai Bharti 2023 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्या साठी उत्तम आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि आपले अर्ज सादर करावेत.

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

येथे मागविण्यात येत असलेले अर्ज संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या www.mmed-edu.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या कालावधीपर्यंत सादर करायचे आहेत. अर्ज शासकीय सुट्टी वगळुन ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील.

येथे अर्ज करताना उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन Upload करणे अनिवार्य राहील. अर्ज करण्यासाठी लिंक www.mod-edu.in वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मुलाखतीबाबत आणि नियुक्तीबाबतची माहिती संचालनालयाच्या संकेत स्थळावर वेळोवेळी कळवले जाईल.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भारती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पद संख्या

या भरती अंतर्गत एकूण 29 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 69 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास ggmcjjh.com या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
– ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी येथे क्लिक करा.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडवीत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
-अर्ज संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या www.med-edu.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १४/१०/२०२३ पासून उमेदवार पंधरा दिवसांच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर करू शकतो.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe