Yamaha ने गाड्यांची अनेक मॉडेल बाजारात आणली. Yamaha चे YZF-R15 V3.0 मॉडेल भारतात लोकप्रिय झाले. आता हे मॉडेल महागणार आहे. कंपनीने याची कीम्मत वाढवली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही बाइक कंपनीने इंजिनसाठी लागू झालेल्या नवीन निकषांसह म्हणजेच अपडेटेड बीएस-6 इंजिनमध्ये लॉन्च केली.
त्यानंतर पहिल्यांदाच कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. यामाहा YZF-R15 V3.0 बाइकच्या सर्वात लोकप्रिय रेसिंग ब्लू कलर व्हेरिअंटची किंमत कंपनीने एक हजार रुपयांनी वाढवली आहे.
आधी या कलर व्हेरिअंटची किंमत 1,45,900 रुपये होती. पण आता तुम्हाला या बाइकसाठी 1,46,900 रुपये मोजावे लागतील.
तर, थंडर ग्रे कलर ऑप्शनची किंमत आधी 1,45,300 रुपये होती, पण आता 1,45,800 रुपये झाली आहे. या बाइकच्या किंमतीत कंपनीने 500 रुपयांची वाढ केली आहे.
तर, डार्क नाइट कलर व्हेरिअंटच्या किंमतीतही कंपनीने 600 रुपयांची वाढ केली असून ही बाइक आता 1,47,900 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.