Ahmednagar Politics :- सध्या अहमदनगर भाजपमध्ये सगळंच काही आलबेल आहे असे वाटत असले तरी चित्र मात्र वेगळेच आहे. भाजपच्या मूळ नेत्यांत सध्या नाराजीचा सूर दिसत आहे. त्याचेही अनेक कारणे आहेत. विखेंच्या विरोधात नाराजीचा सूर का आहे? पंक्षांतर्गत धुसफूस विखेंना जड जाणार का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मोठ्या नेत्यांचे उत्तरेला प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला शिर्डीत येत आहेत. मागेही अमित शहा हे प्रवरेत आले होते. यांसोबतच अनेक भाजप श्रेष्टी फक्त अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात येताना दिसतात. हा मुद्दा विखेंची प्रतिष्ठा वाढवणारा असला तरी याच मुद्द्यावरून दक्षिणेतील भाजप नेते नाराज आहेत. भाजपचे सर्वच मोठे नेते अहमदनगरच्या उत्तर भागात येतात दक्षिण नगर जिल्ह्याला डावललं जातय अशी भावना या नेत्यांत तयार झाली आहे.
विशेष म्हणजे ही भावना कर्डीले, राजळे, शिंदे या आजी माजी आमदारांनी उघड बोलून दाखवली आहे. शिर्डीसारखे एखादे मंदिर दक्षिण नगरमध्ये बांधलं पाहिजे, म्हणजे भाजप नेते दक्षिणेलाही येतील अशी खंत आ. मोनिका राजळे यांनी व्यक्त करून दाखवली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्या आधीच उत्तर आणि दक्षिणेतील नेत्यांमधील मतभेद समोर आलेत.
आ. राम शिंदे यांची भूमिका काय?
पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अहमदनगर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेतली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्वच मोठ्या नेत्यांचे दौरे हे उत्तर अहमदनगर जिल्ह्यात होत असून ते कधी शिर्डी तर कधी लोणी-राहता येथे कार्यक्रमास येतात. दक्षिण नगर जिल्ह्याला कुठेतरी डावलले जात आहे असे आमदार राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
माजी आ. कर्डीले व आ. राजळे यांचे मत काय ?
राधाकृष्ण विखे शहराचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांच्या मतदारसंघात भाजपच्या बड्या नेत्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. भाजप आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, दक्षिणेत मोठे नेते यावेत यासाठी दक्षिणेत शिर्डीसारखे मंदिर उभारावे लागेल. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही याला दुजोरा देत तीच खंत व्यक्त केली.
मंत्री राधाकृष्ण विखेंनी दावा फेटाळला
जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तरेतील भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत असल्याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे यांना विचारले असता, आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे ते म्हणाले. भविष्यात दक्षिणेत देखील कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील आणखी राजकीय बातम्या
- खासदार सुजय विखेंसाठी लोकसभा अवघड ! सत्ताधारी पक्षातील हे दोन आमदार ठरणार धोकादायक ???
- ‘सुजय विखेंना अजित दादांकडे घेऊन जातो, त्यांनी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवावी’, विखेंना राष्ट्रवादीत आणण्यासाठी आ. जगतापांच्या हालचाली
- अहमदनगरला लाल दिवा मिळणार ? आ.निलेश लंकेंचा ‘तो’ ‘करेक्ट’ कार्यक्रम जादू करणार की, आ.संग्राम जगतापांच बदलत राजकारण वरचढ ठरणार
- आमदार रोहित पवार अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार ? रोहित पवारांचं एका वाक्यात उत्तर…