Post office scheme : पोस्ट ऑफिसची धमाकेदार स्कीम, दरमहा कमवा 9,250 रुपयांचे उत्पन्न !

Published on -

Post office monthly income scheme : पोस्टाद्वारे अनेक योजना बचत योजना राबवल्या जातात, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी येथे एकापेक्षा एक योजना आहेत. तुम्ही देखील सध्या पोस्टाची उत्तम योजना शोधत असाल तर आज आम्ही अशीच एक योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

खरे तर पोस्ट ऑफिस योजना गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. कारण येथील पैशांची हमी केंद्र सरकार घेते. आम्ही आजज्या पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल सांगणार आहोत त्यामध्ये गुंतवणूकदार दरमहा 9250 रुपये कमवू शकतात. पोस्ट ऑफिसची ही योजना नियमित उत्पन्न म्हणून काम करते. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना. पोस्ट ऑफिस या योजनेवर ७.४ टक्के वार्षिक व्याज ऑफर करते. ही कमी जोखीम असलेली मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेत निश्चित व्याज उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सिंगल अकाउंट आणि जॉइंट खाती दोन्ही उघडता येतात. यामध्ये एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 लोक एकत्र खाते उघडू शकतात. म्हणजेच पती-पत्नी एकत्र गुंतवणूक करू शकतात.

पोस्ट ऑफिस एमआयएस खात्याची विशेष वैशिष्ट्ये

तुम्ही यामध्ये किमान 1000 च्या पटीत गुंतवणूक करू शकता. तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही 9 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 5,500 रुपये मिळतील. जर तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 9,250 रुपये मिळतील.

योजना मुदतपूर्व बंद करण्यासाठी लागू शुल्क

-खाते एका वर्षानंतर मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. मात्र, त्यानंतर त्यावर 2 टक्के शुल्क वजा केले जाईल आणि 3 वर्षांनंतर बंद केल्यावर 1 टक्के शुल्क कापले जाईल.

-पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोण खाते उघडू शकते?

-एकल प्रौढ किंवा संयुक्त खाते जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्ती उघडू शकतात. यामध्ये दरमहा 5,500 ते 9,250 रुपये उत्पन्न मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News