ब्रेकिंग : गच्चीवर खेळणाऱ्या बहीण-भावाचा शॉक बसून मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

कर्जत :- तालुक्यातील गवंडी गल्लीत घराच्या गच्चीवर खेळत असताना विजेचा धक्का बसून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला.

आयर्न विनय कुमार निषाद (वय ७ वर्ष) व जानवी विनय कुमार निषाद (वय ३) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि रात्री घराच्या गच्चीवर खेळत असताना आयर्न (वय ७ वर्ष) व जान्हवी(वय ३ वर्ष) या दोघांना विजेच्या प्रवाहाचा धक्का बसला आणि दोघा बहिण- भावाचा जागीच मृत्यू झाला.

साडेसात वाजता मूळचे उत्तर प्रदेशमधील असलेले विनय कुमार निषाद हे घराला रंग देण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते.

त्यानंतर दोघे सोमवारी सायंकाळी घराच्या गच्चीवर खेळायला गेले होते. त्यांची आई घरात स्वयंपाक करीत होती, तर वडील रंगकामासाठी गेले होते.

खेळाता खेळता मुले गच्चीवर गेली. तेथे विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांना धक्का बसला. विजेच्या धक्क्याने दोघेही शेजारील घराच्या पत्र्याच्या छतावर फेकले गेले.

शेजारच्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिकडे धाव घेतली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment