अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- ‘पार्टी विथ डिफरन्स’ पाठ थोपटून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा फेज – 2 या कारखान्यातून
धुळे येथे हातभट्टी दारुसाठी स्पिरिटची विक्री केली जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी कारखान्यातील दोन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.
पाचपुते यांच्या साईकृपा फेज – 2 या खासगी कारखान्यातील डिसलरी विभागातील कर्मचारी सुधाकर एकनाथ ससे (रा. वांबोरी, ता. राहुरी), दादाराम तुकाराम ओव्हाळ (रा. पारगाव, ता. श्रीगोंदा) यांना अटक करण्यात आली आहे.
माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा हा खासगी कारखाना असून पाचपुते यांच्यासह त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते, पत्नी प्रतिभाताई पाचपुते हे या कारखान्यात संचालक आहेत.
भाजप आमदाराच्या कारखान्यातून हातभट्टी दारूसाठी स्पिरीटची विक्री होत असल्याचे उघड झाल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच ‘पार्टी विथ डिफरन्स ‘ची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
हा व्यवहार कर्मचारी कसे करू शकतात?
‘स्पिरीट’चा लाखो रुपयांचा व्यवहार दोन कर्मचारी कसे करू शकतात? यात कारखान्याचे व्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तपासात त्यांचा सहभाग आढल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com