Google Pay : काय सांगता ! आता Google Pay ॲपवरही मिळणार कर्ज, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Published on -

Google Pay : जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी असलेल्या गुगलने भारतीयांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या अंतर्गत छोट्या व्यावसायिकांना भरपूर फायदा मिळणार आहे. Googleच्या या योजनेमुळे पेटीएम आणि भारतपे सारख्या कंपन्यांसाठी मोठे आव्हान असू शकते. गुगल इंडियाने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्याच्या उद्देशाने गुगल पे ऍप्लिकेशनद्वारे कर्ज (GPay कर्ज) देण्याची सुविधा सुरू केली आहे.

भारतातील व्यापाऱ्यांना अनेकदा छोट्या कर्जाची गरज असते. या उद्देशाने याद्वारे गुगल पे ने ही सुविधा सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

Google Pay द्वारे ग्राहकांना अगदी कमी वेळेत आणि कमी कागदपत्रांसह कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जावे लागणार नाही. तुम्हाला हे कर्ज ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. कंपनीने या छोट्या कर्जांला सॅशे लोन असे नाव दिले आहे. वापरकर्ते Google Pay द्वारे हे कर्ज घेऊ शकतात.

सर्वसामान्यांनाच मिळणार कर्जाची सुविधा

लहान व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी Google Pay ने DMI Finance सोबत भागीदारी केली आहे. इतकेच नाही तर, Google Pay ने ePayLater सोबत भागीदारी करून व्यापाऱ्यांसाठी क्रेडिट लाइन सक्षम करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. याचा वापर करून, व्यापारी सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करू शकतात. कंपनी ‘गुगल पे’ डेटाबेस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून लोकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज देईल. यासाठी गुगलने अनेक बँका आणि NBFC (Non Banking Finance Company) यांच्याशी करार केला आहे. देशातील कर्ज क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे गुगल या सेगमेंटमध्ये जबरदस्त एंट्री करण्याच्या तयारीत आहे.

सॅशे लोन म्हणजे काय?

सॅशे लोन हे एक प्रकारचे लहान कर्ज आहेत. हे अल्प कालावधीसाठी उपलब्ध आहे. सहसा अशी कर्जे पूर्व-मंजूर असतात. तुम्हाला हे सहज मिळतात. ही कर्जे 10,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहेत. त्यांचा कार्यकाळ 7 दिवस ते 12 महिन्यांचा आहे. या प्रकारचे कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला एकतर ॲप डाउनलोड करावे लागेल किंवा तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील भरू शकता. एकूणच, इतर कर्जांप्रमाणे यासाठी फारशी गडबड करावी लागत नाही.

कर्ज कोणाला मिळणार?

सध्या कंपनीने टियर 2 शहरांमध्ये सॅशे लोन सुविधा सुरू केली आहे. ज्या लोकांचे मासिक उत्पन्न 30,000 रुपये आहे. त्यांना सहजपणे सॅशे कर्ज मिळू शकते.

गुगलद्वारे कर्जासाठी अर्ज कसा करावा?

1 – सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business ॲप उघडा.

2 – यानंतर लोन्स विभागात जा आणि ऑफर्स टॅबवर क्लिक करा.

3 – तेथे तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम निवडावी लागेल आणि Get start वर क्लिक करावे लागेल.

4 – तुम्ही क्लिक करताच, तुम्हाला कर्ज देणाऱ्या भागीदाराच्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल.

5- यानंतर तुमच्या Google खात्यात लॉगिन करा. तिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देखील द्यावी लागेल. तसेच, कर्जाची रक्कम ठरवावी लागेल आणि कर्ज कोणत्या कालावधीसाठी घेतले जात आहे ते नमूद करावे लागेल.

6 – यानंतर तुम्हाला तुमच्या अंतिम कर्ज ऑफरचे पुनरावलोकन करावे लागेल आणि कर्ज करारावर ई-स्वाक्षरी करावी लागेल.

7 – हे सर्व केल्यानंतर, तुम्हाला काही KYC कागदपत्रे सबमिट करावी लागतील. ज्यामुळे तुमची पडताळणी होईल.

8 – यानंतर, EMI पेमेंटसाठी तुम्हाला Setup eMandate किंवा Setup NACH वर क्लिक करावे लागेल.

9 – पुढील चरणात तुम्हाला तुमचा कर्ज अर्ज सबमिट करावा लागेल आणि तुम्हाला कर्ज मिळेल.

10 – तुम्ही तुमच्या ॲपच्या माय लोन विभागात तुमच्या कर्जाचा मागोवा घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News