अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसामुळे धावपळ

Published on -

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी आहे. मात्र, किराणा, औषधे, भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्‍या नागरिकांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे धावपळ उडाली.

रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांचे हाल झाले. जवळपास दीड तास सुरू असणार्‍या या पावसामुळे शहरातील माळीवाडा, पटवर्धन चौक, मार्केट यार्ड, सर्जेपुरा, सावेडीतील कुष्ठधाम रोड, पाइपलाइन रोड, यासह तालुक्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली.

यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती. या पावसामुळे शहरात काही पत्र्याचे शेड पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

जवळपास दीड तास सुरू असणाऱ्या या पावसामुळे शहरातील माळीवाडा, पटवर्धन चौक, मार्केट यार्ड, सर्जेपुरा, सावेडीतील कुष्ठधाम रोड, पाइपलाइन रोड अशा बहुतांश भागात पाणी साचले होते.

त्यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती. या पावसामुळे शहरात दोन ते तीन ठिकाणी पत्र्याचे शेड पडल्याच्या घडना घडल्या आहेत. स्वास्तिक चौकातील एका हॉटेलची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळं नुकसान झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe