FD Rates : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2022 च्या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदार त्यांचे पैसे सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये जमा करण्यास प्राधान्य देतात. आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांमधील एफडी गुंतवणूक एकूण बँक ठेवींपैकी 76 टक्के आहे.
लहान खाजगी क्षेत्रातील बँका जास्त व्याजदर देत असतानाही गुंतवणूकदार मोठ्या बँकांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य देत आहेत. म्हणूनच आज आपण येथे देशातील टॉप 8 बँकांच्या 3 वर्षांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वोत्तम व्याज देते. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये होईल.
कॅनरा बँक
कॅनरा बँक तीन वर्षांच्या एफडीवर ६.८ टक्के व्याज देत आहे. येथे गुंतवलेली १ लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत १.२२ लाख रुपये होईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), युनियन बँक ऑफ इंडिया (UBI), बँक ऑफ इंडिया (BOI) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) तीन वर्षांच्या FD वर 6.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.21 लाख रुपये होईल.
युको बँक
युको बँक तीन वर्षांच्या एफडीवर ६.३ टक्के व्याज देत आहे. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.21 लाख रुपये होईल.
इंडियन बँक
इंडियन बँक तीन वर्षांच्या एफडीवर ६.२५ टक्के व्याज देत आहे. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.20 लाख रुपये होईल.
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँक तीन वर्षांच्या एफडीवर ६ टक्के व्याज देत आहेत. येथे गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.20 लाख रुपये होईल.
DICGC
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC), RBI ची उपकंपनी, 5 लाखांपर्यंतच्या FD वर गुंतवणुकीची हमी देते.