आज शिर्डीमध्ये जवळपास 7500 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केले. अहमदनगर जिल्ह्यासाठीचा जिव्हाळ्याचा निळवंडेच्या कालव्यात पाणी सोडत जलपूजनही केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. दरम्यान सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघात केला.

नरेंद्र मोदींनी थेट हिशोबच विचारला
यावेळी मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्या टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता, केंद्रामध्ये अनेक वर्षे कृषी मंत्री राहिला. परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही.
शरद पवारांनी त्यांच्या सत्ताकाळात सरकारने देशभरातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले आहे. दुसरीकडे आमच्या सरकारने गेल्या सात वर्षांत शेतकऱ्यांना साडेतेरा लाख कोटी रुपये दिले आहेत.
2014 पूर्वी शेतकऱ्यांचा माल 500 ते 600 कोटी रुपयांच्या हमीभावाने खरेदी केला जात होता, परंतु आमच्या सरकारने 1 लाख 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पवारांच्या काळात पैशासाठी दलालांवर अवलंबून
शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना पैशासाठी दलालांवर अवलंबून राहावं लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक वर्षे पैशांपासून वंचित राहावे लागत होते. पैशांसाठी हेलपाटे मारावे लागायचे. परंतु भाजप सरकारने एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेऊन सर्व भ्रष्टाचार संपवला असंही मोदी म्हणाले.