कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव मार्ग सध्या आहे. मात्र अनेक नागरिक या सुरक्षेच्या उपायांपासून दूर पळताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करत आहेत.
त्यामुळे अशा लोकांना इंडोनेशियामध्ये अजब शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे.
गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास शिक्षा म्हणून टॉयलेट साफ करावे लागती. सुधारणा व्हावी यासाठी देण्यात आलेल्या शिक्षेपैकी एक शिक्षा आहे.
कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखणं हा या शिक्षेमागील उद्देश आहे. अशाच पद्धतीनं मास्क न लावणाऱ्यांना 17 डॉलर्स दंड भरावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
इंडोनेशियामध्ये आतापर्यंत 1028 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 15,438 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.
त्यामुळे देशात कोरोनाव्हायरसचा धोका अधिक वाढू नये, तो पसरू नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत.
मात्र अशा परिस्थितीतही लोकं या नियमांचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे शिक्षा देण्याबाबत निर्णय घेतले जात आहेत.