HRA Hike: महागाई भत्तावाढीनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडेभत्ता देखील वाढणार? वाचा किती होईल वाढ?

Ajay Patil
Published:
house rent allowence update

HRA Hike:- केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच सणासुदीच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्तावाढीची महत्त्वपूर्ण भेट मिळाली आहे. तसेच बोनस, महागाई भत्तावाढ व थकबाकी या सर्व गोष्टी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार असल्यामुळे सणासुदीच्या कालावधी कर्मचाऱ्यांचा चांगला जाईल अशी सद्यस्थिती आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारने महागाई भत्ता हा 42% वरून 46% केला व हा एक जुलै 2023 पासून लागू होणार आहे. महागाई भत्ता वाढ झाल्यामुळे आता इतर भत्त्यांमध्ये देखील वाढ होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्या अनुषंगाने आता महागाई भत्ता वाढीनंतर घर भाडेभत्ता देखील वाढण्याची शक्यता आहे.

जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर जुलै 2021 मध्ये 25% च्या पुढे गेल्यावर घर भाडेभत्त्यात तीन टक्क्यांची शेवटची सुधारणा करण्यात आली होती. म्हणजेच 24 टक्क्यांवर तो 27% करण्यात आला होता. आता पुन्हा घर भाडे भत्यात तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे घर भाडे भत्तावाढ कधी केली जाईल याबाबतीत नक्कीच कर्मचाऱ्यांमध्ये प्रतीक्षा असणार आहे.

 घर भाडेभत्ता कधी वाढणार?

केंद्र सरकारच्या कार्मीक आणि प्रशिक्षण विभाग यांच्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता घर भाडेभत्त्यामध्ये सुधारणा ही महागाई भत्त्याच्या आधारावर केली जाते. घर भाडे भत्ताच्या एक्स, वाय आणि झेड अशा श्रेणी असून त्या शहरानुसार आहेत. सध्याच्या शहरी श्रेणीनुसार जर घर भाडेभत्ता व त्याचा दर पाहिला तर तो एक्स श्रेणीतील शहरांकरिता 27%, वाय श्रेणीतील घरांसाठी 18% आणि झेड श्रेणीतील घरांसाठी नऊ टक्के इतका आहे.

ही लागू असलेली घरभाडे भत्तावाढ एक जुलै 2021 पासून लागू आहे.साधारणपणे घर भाडे भत्त्यातील वाढ ही वर्ष 2024 मध्ये होईल अशी अपेक्षा आहे. परंतु सुरुवातीच्या काही महिन्यातच त्यामध्ये वाढ केली जाईल अशी अपेक्षा आहे.

 घर भाडेभत्त्यातील पुढील सुधारणा किती टक्के असेल?

घर भाडेभत्त्यात होणारी पुढील सुधारणा तीन टक्के असेल अशी शक्यता आहे. सध्या एचआरआय अर्थात घरभाडे भत्त्याचा कमाल दर 27% आहे व तो 27% वरून 30% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परंतु हे तेव्हा होईल जेव्हा महागाई भत्ता 50% च्या वर जाईल. साधारणपणे जानेवारी 2024 मध्ये हे घडू शकते अशी शक्यता आहे. जेव्हा महागाई भत्ता 50% ही पातळी ओलांडतो तेव्हा घरभाडे भत्ता 30 टक्के, वाय श्रेणी शहरांसाठी 20% आणि झेड श्रेणीसाठी दहा टक्के इतके सुधारणा त्यात होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe