जाणून घ्या Jio च्या रिचार्जवर मिळणाऱ्या ‘बंपर’ कॅशबॅकबद्दल

Ahmednagarlive24
Published:

टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या खूप कॉम्पिटिशन असल्याचे दिसून येत आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या नवनवीन स्कीम ग्राहकांसाठी देत असतात.

रिलायन्स जिओ अन्य कंपन्यांपेक्षा १५ ते २० टक्के हे प्लॅन स्वस्त असल्याचा दावा करते. याशिवाय जिओकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कॅशबॅक ऑफरही आहेत.

PhonePe या अ‍ॅपवर नवीन युजर्सना 75 रुपयांपर्यंत आणि आधीपासून जिओ युजर्स असलेल्यांना 50 रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर आहे. Amazon वर नवीन युजर्सना 200 रुपयांपर्यंत आणि जुन्या युजर्सना 50 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

तर, Paytm वर नव्या युजर्सना 30 रुपये (कोड- PTMJIO30) आणि आधीपासून जिओ युजर्स असलेल्यांना 15 रुपये (कोड- PTMJIO15)कॅशबॅक मिळेल.

याशिवाय Mobikwik वर सर्व युजर्सना 100 रुपये (कोड – JIO50P) सुपरकॅश ऑफर आहे. तर, Freecharge अ‍ॅपवर नवीन युजर्ससाठी 30 रुपये (कोड- JIO30) आणि जुन्या युजर्ससाठी 15 रुपये (कोड- JIO15) कॅशबॅक आहे.

सर्वाधिक फायदा ‘गुगल पे’वर मिळतोय. गुगल पे अ‍ॅपद्वारे तीन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत रिवॉर्ड मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment