Bridge In India: तुम्हाला माहिती आहेत का भारतातील सर्वात मोठे आणि लांब पूल कोणते आहेत? वाचाल माहिती तर व्हाल चकित

Ajay Patil
Published:
biggest bridge in india

Bridge In India:- भारत अतिशय वेगाने विकसित होणारा देश असून तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा भारतामध्ये उभारल्या जात आहेत. पायाभूत सुविधांमध्ये  महामार्गांची निर्मिती हा एक मोठा टप्पा असून या अंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक ठिकाणी बोगदे तसेच मोठे मोठे पूल देखील उभारले जात आहेत.

सध्या तंत्रज्ञानाची प्रगती इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे की समुद्र खालून देखील रस्ते तयार केले जात आहेत. तसेच जर आपण रस्त्यांवर असलेले पूल पाहिले तर पाहूनच आश्चर्य वाटते किंवा धडकी देखील भरते इतक्या अवघड ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

याच अनुषंगाने आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये असे पुलांची निर्मिती करण्यात आलेली आहे की ते सर्वात मोठे आणि लांब देखील आहेत व त्यामध्ये अनेक प्रकारचे वैशिष्ट्ये देखील आहेत. त्यामुळे आपण या लेखात भारतातील सर्वाधिक मोठे आणि लांब पूल कोणते यांची माहिती घेणार आहोत.

 भारतातील सर्वाधिक मोठे आणि लांब पूल

1- दिबांग रिव्हर ब्रिज हा पूल भूपेन हजारिका सेतू नंतरच्या सर्वात लांब पुलात याचा समावेश केला जातो. या पुलाची लांबीचा विचार केला तर ती तब्बल 6.2 किलोमीटर इतके आहे. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश राज्यांमध्ये दिबांग नदीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे. भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनातून या पुलाचे महत्त्व अनन्य साधारण असून भारतासाठी हा पुल खूप महत्त्वाचा मानला जातो.

Navayuga Engineering Company Ltd. | Iconic Projects

2- भूपेन हजारिका सेतू आसाम राज्यातील ईशान्यकडील भागामध्ये भूपेन हजारिका सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. आसाम राज्यातील लोहिया या नदीवर हा पूल उभारण्यात आला असून तो तब्बल 9.15 किलोमीटर लांबीचा आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाम या दोन्ही राज्यांची कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टिकोनातून या पुलाचे महत्व अनन्यसाधारण आहे. साधारणपणे 2017 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

China tells India on Bhupen Hazarika bridge | India News - Times of India

3- महात्मा गांधी सेतू हा पूल बिहार राज्यात असून पाटण्यामध्ये आहे. या पुलाची लांबी सुमारे 75.7575 किलोमीटर इतकी आहे. हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आणि लांब पूल मानला जातो. गंगा नदीवर हा पूल बांधण्यात आला असून तो पाटणा शहर आणि हाजीपुर या दोन शहरांना जोडतो. या पुलाचे बांधकाम 1982 साली करण्यात आलेले आहे.

Mahatma Gandhi Setu, India's Longest Steel Bridge, All Set To Fully Open  For Traffic on June 7 | Details Here

4- वांद्रे वरळी सी लिंक मुंबई या ठिकाणी वांद्रे वरळीचे लिंक हा भारतातील सर्वात लांब पुलांपैकी एक पूल आहे. याची लांबी 6.6 km असून तो वांद्र्याला मुंबईच्या पश्चिम शहरांशी जोडतो. या पुलालाच राजीव गांधी सी लिंक म्हणून देखील ओळखले जाते. सन 2009 मध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले.

Mumbai: Vile Parle man jumps into sea from Bandra-Worli Sea Link bridge,  rescupr operations underway | Mumbai News - Times of India

5- बोगीबिल सेतू आसाम मधील हा एक सर्वात मोठा पूल असून याची लांबी 9.9 किलोमीटर आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल बांधलेला आहे व हा पूल आब्रम आणि अरुणाचल प्रदेश ला जोडणाऱ्या दिब्रुगड मध्ये आहे. सैन्याच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा पुल आहे.

Bogibeel Bridge - Wikipedia

6- विक्रमशीला सेतू बिहार राज्यात असलेल्या महात्मा गांधी सेतू नंतर विक्रमशीला सेतू हा सर्वात मोठा पूल आहे. याची लांबी 7.7 किलोमीटर असून हा पूल नॅशनल हायवे 80 आणि नॅशनल हायवे 31 यांना जोडतो. याचे बांधकाम 2001 मध्ये पूर्ण झाले.

Bhagalpur Vikramshila Setu will be completed soon Four Lane bridge |  भागलपुर में जल्द पूरा होगा विक्रमशिला सेतु का समानांतर फोरलेन पुल | Hindi  News, पटना

7- आराछपरा ब्रिज हा देखील भारतातील सर्वात लांब रस्ते पुलांपैकी एक असून आरा आणि छपरा या दोन शहरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. याच पुलाला वीर कुंवरसिंग सेतू असे देखील म्हणतात. हा गंगा नदीवर बांधलेला पूल असून याची लांबी 4.65 किलोमीटर आहे.

4.35 Km long 4 Lane H.L Bridge with approach road across river Ganga  including 1920m long extradosed bridge connecting Ara-Chhapra in Bhojpur,  Bihar | SP Singla Constructions Pvt. Ltd.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe