Poultry Feed Business:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय जितका वेगात पसरला तितक्याच वेगात आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे व्यवसाय केले जातात. कुक्कुटपालन व्यवसाय असो किंवा पशुपालन यामध्ये पशुंना किंवा कुक्कुटपालन व्यवसायात कोंबड्यांना खाण्यासाठी खाद्य हे लागते. याच अनुषंगाने जर आपण कुक्कुटपालन व्यवसायाचा विचार केला तर हा वेगाने विकसित आणि वाढत जाणारा व्यवसाय असल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाशी निगडित असलेल्या इतर व्यवसायांना नक्कीच भविष्यात खूप मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे.
त्यामुळे पोल्ट्री फीड अर्थात कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य तयार करण्याच्या व्यवसायामध्ये खूप मोठा आर्थिक नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो. परंतु कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं म्हणजे त्यासाठी पैसा तर लागतोच आणि त्याचे नियोजन करणे देखील महत्त्वाचे असते. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण पोल्ट्री फीड व्यवसायाची सुरुवात कशी करावी व त्या माध्यमातून किती नफा मिळू शकतो याबद्दल माहिती घेऊ.
कोंबड्यांचे खाद्य अर्थात पोल्ट्री फीड बनवणे हा एक चांगला व्यवसाय
कुक्कुटपालनाकडे लोकांची आवड वाढत असून या व्यवसायात सर्वात जास्त गरज ही चिकन फीड किंवा पोल्ट्री फीडची असते. जर आपण कुक्कुटपालन व्यवसायाचा विचार केला तर यामध्ये एकूण जो काही खर्च होतो यापैकी तब्बल ६० टक्के खर्च हा पोल्ट्री फीड वर होत असतो.
पोल्ट्री फीड बनवणे आणि त्याची विक्री करणे हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो. पोल्ट्री फीड व्यवसायामध्ये असलेली बरेच लोक हे स्वतः कुकूटपालन व्यवसाय देखील करतात.शिवाय काही कंपन्या पोल्ट्री फीड देखील तयार करतात. कोंबड्यांची वाढीनुसार पोल्ट्री फीड तयार केले जाते. चांगल्या दर्जाचे पोल्ट्री फीड शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.
पोल्ट्री व्यवसायात किती आहे संधी?
पोल्ट्री फीड मिल हा उद्योग वेगाने वाढणारा असून यामध्ये दरवर्षी पंधरा टक्के दराने वाढ होत आहे. भारतामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय अतिशय वेगाने विकसित होत असून वेगाने नवीन पोल्ट्री फार्म देखील उभारले जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पोल्ट्री फीड अर्थात कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्याची मागणी निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू केल्यास भरपूर नफा मिळू शकतो.
पोल्ट्री फीड व्यवसाय कसा सुरू करावा?
पोल्ट्री फीड व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला कमीत कमी 800 चौरस फुट ते 1000 चौरस फूट जागेची आवश्यकता भासते. तसेच हे फीड बनवण्यासाठी तुम्हाला कच्चामाल देखील लागतो याकरिता तुम्ही मका, बाजरी तसेच सोयाबीन केक व मोहरीचा केक तसेच वाळलेल्या तांदळाचा कोंडा इत्यादी कच्चामालाची आवश्यकता असते. तसेच या व्यतिरिक्त जीवनसत्वे आणि खनिजे देखील यामध्ये आवश्यक असतात.
कोंबड्यांना त्यांच्या वयानुसार तीन प्रकारचे खाद्य दिले जाते व त्यानुसारच पोल्ट्री फीड मीलमध्ये देखील खाद्य तयार केले जाते. त्यामुळे कोंबड्यांची पूर्ण वाढ होण्यास मदत होते. हा कच्चा माल तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या आणि परिसरातील बाजारपेठेत सहजपणे मिळतो.जर तुम्ही छोट्या प्रमाणावर या व्यवसायाची सुरुवात केली तर तुम्हाला यांत्रिकीकरणावर जास्त खर्च करावा लागणार नाही.
पोल्ट्री फीड तयार करण्याकरता तुम्हाला काही मशीन्स लागतात व ही यंत्र कोणत्याही मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला मिळून जातात. तसेच तुम्ही इंडिया मार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून देखील ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता. मशीन आणि इतर खर्च म्हणून तुम्ही दहा लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतात.
पोल्ट्री फीड व्यवसाय मध्ये किती नफा मिळेल?
तुम्ही अगदी छोट्या प्रमाणावर या व्यवसायाची सुरुवात केली तरी तुम्ही दहा ते बारा टक्क्यापर्यंत सुरुवातीला नफा या माध्यमातून मिळवू शकतात. तुम्ही तुमचा माल रिटेल मध्ये विकला तर तुम्हाला जास्तीची कमाई होईल आणि तुमचे मार्जिन 22% पर्यंत या माध्यमातून मिळू शकते. या व्यवसायात अधिक नफा आहे तुमचे उत्पादन तुम्ही किती माल बनवतात आणि किती माल विकत आहेत यावर अवलंबून आहे. जितकी तुमची विक्री जास्त असेल तितका तुमचा नफा जास्त असतो.