Prawn Farming:- शेतीला जोडधंदा म्हणून प्रामुख्याने पशुपालन तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन तसेच इत्यादी व्यवसाय आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. कारण नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीला काहीतरी जोडधंद्यांची मदत देऊन शेतकऱ्यांनी स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे खूप गरजेचे आहे. तसेच शेतीमध्ये ज्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो अगदी त्याच पद्धतीने आता शेती संबंधित असलेल्या जोडधंद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.
उदाहरणच घ्यायचे झाले तर कुक्कुटपालन व्यवसाय आता घरातील परस बागेपुरता मर्यादित राहिला नसून त्याला आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात आहे. अगदी त्याच पद्धतीने आता शेतकरी बंधू मत्स्य शेतीच्या माध्यमातून देखील खूप चांगली आर्थिक उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.
मत्स्यशेतीमध्ये विविध प्रकारचे माशांचे पालन केले जाते. जर आपण माशांचे वेगवेगळे प्रकार पाहिले तर यामध्ये लॉबस्टर किंवा प्रॉन किंवा त्यालाच आपण कोळंबी म्हणतो हा एक माशांचा प्रकार असून याचे पालन केल्यामुळे किंवा कोळंबी शेती केल्यामुळे खूप मोठा आर्थिक फायदा आपल्याला मिळू शकतो. कारण कोळंबीला जगभरातील अनेक देशांमध्ये खूप मोठी मागणी असल्यामुळे याला भविष्यात खूप चांगले संधी आहे. या अनुषंगाने या लेखात आपण कोळंबी शेती कशी सुरू करावी याबद्दलची माहिती घेऊ.
कोळंबी पालन किंवा कोळंबीची शेती कशी सुरू करावी?
1- कोळंबीचे फायदे काय आहेत?- कोळंबी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील याला खूप मागणी आहे. कोळंबी मध्ये फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते व ते हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते. यामुळे देखील कोळंबीला बाजारपेठेत खूप मोठी मागणी आहे.
2- कोळंबी पालन किंवा कोळंबीची शेती कशी सुरू करावी?- याकरिता तुम्हाला 1500 चौरस फूट जमीन किंवा क्षेत्र पुरेसे आहे. कोळंबी लागवड किंवा कोळंबी पालनाकरिता तुम्हाला आठ बाय आठ फूट आकारमानाचा तलाव तयार करावा लागतो व तो सुमारे पाच फूट खोल असावा. तुम्हाला तलावा करिता सुरुवातीला प्रति एकर 75 हजार रुपये पर्यंत खर्च येईल व त्यानंतर मात्र आठ ते नऊ महिन्यात यामध्ये लॉबस्टर अर्थात कोळंबी तयार होते.
यामध्ये तलावामध्ये कोळंबी पालन करण्याकरिता तो पुरेसा आकाराचा असणे गरजेचे आहे. कोळंबी पालनाकरिता तुम्हाला चांगल्या जागेची निवड करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक असणे देखील महत्त्वाचे आहे. कोळंबी पालणा करता तुम्हाला स्वच्छ पाण्याचे स्त्रोत असलेले तलाव असणे महत्त्वाचे आहे. तसेच चांगल्या प्रतीचे कोळंबीचे बीज अर्थात बियाणे यासाठी वापरणे महत्त्वाचे आहे.
तसेच तलावाच्या पायथ्याशी असलेल्या मातीचा पीएच तसेच स्वच्छ पृष्ठभाग असावा व त्याचा पीएच सात ते आठच्या दरम्यान असावा. तसेच तलावाच्या काठाच्या पृष्ठभागावर रोगप्रतिरोधक रासायनिक फवारणी करणे गरजेचे आहे. तलावातील कोळंबीना तुम्हाला रोगांपासून दूर ठेवता येते. यामध्ये शेणखत वापरावे लागते व ते तलावाचे सुपीकता वाढवण्याकरिता उपयुक्त असते. यामुळे तलावामध्ये वनस्पती आणि प्लॅकटन देखील वाढण्यास मदत होते.
3- कोळंबी पालन करीता जातींची निवड महत्त्वाची– तुमच्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार विशिष्ट उच्च उत्पन्न देणाऱ्या कोळंबीच्या जातींचे पालन करावे किंवा लागवड करावी. निसर्गामध्ये झपाटाने वाढणारी आणि कमीत कमी काळजी किंवा व्यवस्थापन आवश्यक आहे व चांगला परतावा देऊ शकेल अशा जातींची निवड महत्त्वाची ठरते.
4- तलावातील पाण्यावर प्रक्रिया किंवा उपचार– निरोगी कोळंबीच्या उत्पादनाकरिता तलावाच्या पाण्यावर प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता तलावाच्या पाण्यामध्ये कोणते घटक आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे व त्यानंतर उच्च आणि दर्जेदार कोळंबीचे उत्पादनाकरिता आवश्यक असलेले सर्व घटक योग्य जलशुद्धीकरणाच्या मदतीने तलावाच्या पाण्यात मिसळणे गरजेचे आहे.
5- एका तलावात किती कोळंबी पालन करता येते?- जर त्याला 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद आणि दोन फूट खोल असेल तर तुम्ही यामध्ये तीन हजार कोळंबी पालन करू शकतात. त्यांच्या निरोगी वाढीसाठी दोन ते तीन वेळा खायला द्यावे लागते. या बिझनेस प्लॅन मध्ये सुरुवातीला भांडवल म्हणून पन्नास हजार रुपये गुंतवल्यास तुम्ही सहजपणे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकतात.