Tourist Place: स्वर्गापेक्षा सुंदर आहेत भारतातील ‘ही’ पर्यटन स्थळे! जगातील पर्यटक देतात भेटी,तुम्ही कधी जाल?

Published on -

Tourist Place:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना भटकंती करण्याची खूप हौस असते. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी असे भटकंतीची हौस असलेली व्यक्ती फिरत असतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा आपण पर्यटन करतो तेव्हा आपल्याला त्या त्या ठिकाणची संस्कृती तसेच इतिहास, निसर्ग सौंदर्य व त्या ठिकाणचे स्थानिक खाद्यपदार्थ व जीवनशैली याचा अनुभव जवळून घेता येतो. तसेच आपल्याला भरपूर वेगवेगळी माहिती या माध्यमातून मिळते व आपल्या ज्ञानात देखील भर पडत असते व त्यामुळे आपण त्या माध्यमातून जीवन समृद्ध देखील करू शकतो.

पर्यटन करणारे व्यक्ती हे भारतातच नाही तर परदेशात देखील अनेक ठिकाणी भेटी देत असतात. परंतु जर आपण या तुलनेत विचार केला तर भारतात देखील अशी पर्यटन स्थळे आहेत की त्यांना आपण स्वर्गापेक्षा सुंदर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण त्या ठिकाणचे अमोघ असे निसर्गसौंदर्य पाहून मन खूप प्रसन्न होतं. दुसरे महत्त्वाचे म्हणजे भारतात असलेल्या या पर्यटन स्थळांना विदेशातून देखील अनेक पर्यटक भेटी देत असतात. त्याचा अनुषंगाने या लेखामध्ये आपण भारतातील काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

 भारतातील काही निसर्ग सौंदर्याने पुरेपूर असे पर्यटन स्थळे

1- लडाख लडाख परिपूर्णरित्या निसर्ग सौंदर्याने नटले असून मनाच्या प्रसन्नतेसाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी दूरवर पसरलेल्या दऱ्या तसेच पर्वतरांगा, तलाव आणि निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्याची खूप मोठे संधी मिळते. लडाख या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे असून त्यातील आपल्याला लेह पॅलेस आणि पेगॉन्ग तलाव विशेष प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला तिबेट आणि बौद्ध संस्कृती जवळून पाहता येते. दुसरे म्हणजे या ठिकाणचे स्वादिष्ट खाद्य पदार्थांचा आनंद देखील तुम्ही मोठ्या प्रमाणावर घेऊ शकता.

Ladakh, India (2023) > Leh Ladakh Tourism, Tours & Packages

2- उटी तामिळनाडू राज्यातील उटी हे हिल स्टेशन असून याला हिल स्टेशनची राणी असे देखील म्हटले जाते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे अतिशय सुंदर असे हिल स्टेशन निलगिरीच्या डोंगर रांगांमध्ये वसले आहे. ज्या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. या ठिकाणी असलेले चहाचे विस्तीर्ण असे मळे तसेच तलाव, धबधबे तुम्ही पाहू शकतात.

भारत के खूबसूरत पर्यटक स्थलों में एक है 'ऊटी' - ooti is one of the best  destination to spend holidays-mobile

3- औली या ठिकाणाला पृथ्वीवरचा स्वर्ग देखील म्हटले जाते. या हिल स्टेशनचे निसर्ग सौंदर्य हे खूप विहंगम व हृदयाला स्पर्श करणारे आहे. उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या औलीला मिनी स्वित्झर्लंड असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी असलेल्या सुंदर दऱ्या तसेच उंच पर्वत, धबधबे तसेच नद्या आणि देवदार वृक्षांची घनदाट जंगले पर्यटकांना आकर्षित करतात. ठिकाणी चिनाब तलाव, त्रिशूल शिखर तसेच नंदादेवी हिल स्टेशन व जोशीमठ देखील प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

Summer Holiday Destination 2023: Auli, Coolest Place In India | How to  Reach? Where to Stay? Things To Do - News18

4- माउंट अबू हे हिल स्टेशन राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यामध्ये असून अरवलीच्या टेकड्यांनी वेढलेले आहे. या ठिकाणी तलावात डूबण्याचा आनंद घेता येऊ शकतो. या हिल स्टेशनला राजस्थानचे मसुरी असे देखील म्हटले जाते. माउंट आबू हे ठिकाण जमिनीपासून सुमारे बाराशे वीस मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी असणारे प्राचीन पुरातत्त्व स्थळे आणि या ठिकाणचे आश्चर्यकारक हवामानामुळे  माउंट अबू खूप लोकप्रिय आहे.

Mount Abu Tourist Places to Visit, Tour Packages, Sightseeing and  Attractions - Rajasthan Tourism

5- जोग फॉल्स जोग फॉल्स हा कर्नाटकात असून घनदाट अरण्यामध्ये वसलेला हा धबधबा खूप सुंदर आहे. भारतातील हा दुसरा सर्वात उंच धबधबा असून तो 829 फूट उंचीवरून कोसळतो. अनेक किलोमीटर पर्यंत या धबधब्याचा आवाज ऐकू येतो. या ठिकाणी असलेल्या टेकडीवर बसून तुम्ही धबधब्याचे सौंदर्य पाहू शकतात व आजूबाजूचे वातावरणाचा आनंद घेऊ शकतात.

Jog Falls - The Spellbinding Beauty!

6- मुन्नार केरळ मधील मुन्नार या सुंदर हिल स्टेशनला भेट द्यायचा निर्णय देखील तुमच्यासाठी खूप फायद्याचा होऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही इको पॉईंट तसंच एरवीकुलम नॅशनल पार्क आणि कुंडला लेक यासारख्या पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकतात. याच्या जवळच मरायूर येथे डॉल्मेन आणि रॉक पेंटिंग्स आणि ज्याच्या संग्रहालय देखील आहे. मुन्नार पासून पंधरा किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून सहाशे फूट उंचीवर प्रसिद्ध इको पॉईंट आहे. इथे तुम्हाला तुमच्या आवाजाचा प्रतिध्वनी खूप चांगल्या पद्धतीने ऐकू येतो.

Munnar: A nature lover's treasure trove | Times of India Travel

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe