DA Hike:- सध्या दिवाळी सारखा सण तोंडावर आला असताना सणासुदीच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ केली जाईल अशा आशयाच्या अनेक बातम्या मीडियामधून सातत्याने समोर येत होत्या व कर्मचाऱ्यांना देखील याबाबत फार मोठी अपेक्षा होती.
त्याच अपेक्षेप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देताना त्यांच्याकरिता असलेला महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली. ही वाढ केल्यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अगोदर जो काही 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत होता तो आता 46% इतका झाला.
विशेष म्हणजे करण्यात आलेले आहे या महागाई भत्त्यातील वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे. तसेच या सोबतच जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
त्यामुळे निश्चितच केंद्र सरकारने कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांची दिवाळी गोड होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने देखील महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये वाढ केली आहे व त्यासंबंधीचेच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही अखिल भारतीय सेवेतील अधिकारी कार्यरत आहेत त्या अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून 27 ऑक्टोबर रोजी निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार पाहिले तर आता अखिल भारतीय सेवेत जे काही अधिकारी कार्यरत आहेत त्यांचा महागाई भत्ता हा 42 वरून 46 टक्के इतका होणार आहे. इतकेच नाही तर यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय 27 ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना जो काही महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे तो चालू महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे.
तसेच महागाई भत्ता थकबाकीचा लाभ देखील या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसारखेच आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची दिवाळी देखील आता गोड होणार आहे.