मराठा समाजाचे आंदोलन चांगलेच तापले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचे पडसात पाहायला मिळत आहेत. काल बीडमध्ये आंदोलनास हिंसक वळण लागले आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये बंद ची हाक दिली होती.
राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, निदर्शने, आंदोलने सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची घरे, कार्यालये जाळली आहेत. तर, काही आमदार आणि खासदार पुढे येऊन राजीनामा देत आंदोलनाला सपोर्ट करत आहेत.

सत्ताधारी आमदार बसले उपोषणाला
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता अनेक आमदार खासदार पुढे येऊ लागले आहेत. अनेक खासदार, आमदार इतर गाव पुढाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
आता सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटातील आमदार निलेश लंके हे थेट मुंबई मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आ. निलेश लंके यांच्यासह कैलास पाटील, राजू नवघरे हे आमदार देखील उपोषणाला बसले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी केली ‘ही’ मागणी
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी आता जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाता व्यवसाय शेती, शेतीनुसार कुणबी आरक्षण द्या असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच यापूर्वी ६० टक्के मराठा समाज ओबीसीत गेलेला असल्याचेही वक्तव्य त्यांनी केलंय.
समाज भावुक, जरांगे पाटील आजपासून पाणी पिणार
मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अन्न-पाणी सोडले होते. यामुळे त्यांची प्रकृती पूर्णतः खालावली. मराठा समाज भावुक झाला.
भावुक होऊन समाज बांधवांनी विनंती केल्यामुळे सोमवारी त्यांनी पाणी पिले. त्यांना वारंवार पाणी पिण्याची विनंती समाजातून होत आहे. त्यामुळे त्यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.