Axis Bank Business Loan : व्यवसायासाठी ॲक्सिस बँक देईल 10 लाख रुपये कर्ज ! वाचा अर्ज करण्याची पद्धत, पात्रता आणि कागदपत्रे

Published on -

Business Loan:-सध्या नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुणांना देखील रोजगाराच्या खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाले आहेत. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकऱ्या न मिळाल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे.

त्यामुळे अनेक सुशिक्षित असेल तरुण-तरुणी व्यवसायाकडे वळताना दिसून येतात. परंतु व्यवसाय मध्ये सुद्धा महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात अगोदर व्यवसाय कुठला सुरू करावा हा मोठा प्रश्न उद्भवतो. कोणता व्यवसाय करावा याबद्दल निश्चिती झाल्यानंतर मात्र परत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे व्यवसाय उभारण्याकरिता लागणारा पैसा म्हणजेच भांडवल होय.

व्यवसाय उभारण्यासाठी लागणाऱ्या पैशामुळे अनेक जण व्यवसायापासून दूर राहतात किंवा इच्छा असून देखील त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील व्यवसाय उभारणी करता आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजना राबवल्या जातात. त्यासोबतच अनेक बँकांच्या माध्यमातून देखील व्यवसाय उभारणी करिता व्यवसाय कर्ज अर्थात बिझनेस लोन दिले जाते. याव्यतिरिक्त बऱ्याचदा व्यवसाय सुरू असतो परंतु व्यवसायामध्ये दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील जास्तीचा पैसा आवश्यक असतो.

याकरिता देखील बँकांच्या माध्यमातून बिझनेस लोनच्या स्वरूपात पैसा उभा करता येतो. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँक बिजनेस लोन देतात. परंतु यामध्ये जर आपण सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक असलेल्या ॲक्सिस बँकेचा विचार केला तर ही बँक देखील सर्वांकरिता व्यवसाय कर्ज म्हणजेच बिझनेस लोन देते.

यामध्ये वैयक्तिक तसेच भागीदारी संस्थेतील उद्योग म्हणजेच फर्म असेल किंवा सेल्फ एम्प्लॉईड म्हणजेच वैयक्तिक स्वरूपाचे देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याचा अनुषंगाने आपण या लेखामध्ये ॲक्सिस बँकेकडून कर्ज घेण्यासाठी काय पात्रता लागते तसेच कागदपत्रे कोणकोणते लागतात? याबद्दल महत्वाची माहिती घेणार आहोत.

ॲक्सिस बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता
1- यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचे वय हे 25 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
2- तसेच सुरू व्यवसाय हा पाच वर्ष पूर्वीचा म्हणजेच पाच वर्षापर्यंतचा असावा आणि तीन वर्षे सतत तो फायद्यात चालणारा असावा.
3- यामध्ये जर स्वयंरोजगार व्यावसायिक असतील तर यांच्याकरिता कमीत कमी त्या क्षेत्रातला चार वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
4- तसेच अर्जदाराकडे व्यवसायाकरिता आवश्यक कार्यालय असणे आवश्यक आहे.
5- तसेच अर्जदाराचा बँक रेकॉर्ड म्हणजे सिबिल स्कोर किंवा क्रेडिट हिस्टरी उत्तम असावी आणि ती बँकर्सच्या माध्यमातून तपासली जाते.
6- अर्जदाराच्या नावाने घर किंवा ऑफिस असावे.
7- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचा क्रेडिट स्कोर हा 700 पेक्षा जास्त असावा.

बिझनेस लोनसाठी अर्ज करताना ही कागदपत्रे लागतात
व्यावसायिक कर्जाकरिता ॲक्सिस बँकेत अर्ज करताना तुम्हाला आयडी पुरावा म्हणून पॅन कार्ड /आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते. पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट आवश्यक असतो. त्यासोबतच मालक / फर्म/ कंपनीचे पॅन कार्ड देखील लागते. आयटीआय फाईल गेल्या दोन वर्षापासून, सर्व अर्जदार/ सह अर्जदार / जामीनदारांसाठी पॅन कार्ड / फॉर्म 60, व्यवसायाचा ऑडिट रिपोर्ट, व्यवसाय स्थापन प्रमाणपत्र / जीएसटी प्रमाणपत्र / सेवा कर प्रमाणपत्र, लॉस आणि प्रॉफिट डिटेल्स, ताळेबंद तसेच मंजूर प्राप्ती कर रिटर्न, तुमच्या कंपनीकडे केव्हा व्यवसायाकडे कोणतेही चालू कर्ज थकबाकी असल्यास त्याचा परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड सत्यापित करण्याकरिता कर्ज मंजुरी पत्र आणि बँक स्टेटमेंट देखील आवश्यक असते. कंपनीच्या लेटरहेडवर प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा संपूर्ण व्यवसायाची प्रोफाइल देणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा आणि प्रचलित केवायसी निकषानुसार पत्त्याचा पुरावा आणि प्रक्रिया शुल्काचा धनादेश देखील आवश्यक असतो.

ॲक्सिस बँक तुम्हाला या कामाकरिता व्यवसायात करते आर्थिक मदत
बऱ्याचदा आपण व्यवसायाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करतो आणि आर्थिक दृष्टिकोनातून आपले व्यवस्थापन देखील उत्तम असते. परंतु बऱ्याचदा तरी देखील आर्थिक अडचणी उद्भवतात व व्यवसाय चालवणे कठीण व्हायला लागते. अशा परिस्थितीत देखील ॲक्सिस बँकेकडून तुम्ही बिझनेस लोन घेऊन हे धोके कमी करू शकतात. ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून तुम्ही….

1- वर्किंग कॅपिटल फायनान्स- व्यवसाय सतत सुरळीत चालू ठेवण्यासाठी पैसा लागतोच. त्यामुळे तुमच्याकडे तो उपलब्ध असणे गरजेचे असते. या अनुषंगाने तुम्ही बँकेच्या माध्यमातून कॅश क्रेडिट / ओव्हरड्राफ्ट इत्यादी सुविधा वापरून तुम्ही अल्पमुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. या माध्यमातून तुम्ही तयार वस्तूंची खरेदी किंवा कच्च्या मालाचे खरेदी यासाठी देखील पैसा वापरू शकतात.

2- ट्रेड फायनान्स- इन्व्हाईस किंवा बिल डिस्काउंटिंग हे क्रेडिटवर वस्तूंच्या विक्रीकरिता अल्पकालीन कार्यरत भांडवल वित्तपुरवठा आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जर खरेदीदार देशात किंवा देशाबाहेर असला तरीही पेमेंटच्या अटी व्यवस्थापित करणे कठीण असू शकते. अशा मध्ये तुम्हाला बिल सवलत प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर मदत करू शकते.

3- एक्सपोर्ट फायनान्स-ही एक अनुकूल आणि चांगली अशी सुविधा असून जे निर्यात कंपन्यांना व्यवसायासाठी रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी दिली जाते. हा जो काही कर्जाचा पर्याय आहे तो स्थानिक किंवा संबंधित देशाच्या चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराकरिता शिपमेंट पूर्व आणि पोस्ट फायनान्स करिता उपलब्ध आहे. हे सुविधा देखील ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून देण्यात येते.

4- मुदत कर्ज- नेहमी जो काही खर्च लागतो त्या व्यतिरिक्त भांडवली खर्च तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी देखील पैसा लागतो. याकरता देखील मुदत कर्ज ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून दिले जाते. या मुदत कर्जाचा साधारणपणे कालावधी एक ते दहा वर्षांच्या दरम्यान असतो.

5- बांधकामासाठी फायनान्स- रियल इस्टेट उद्योग सध्या झपाट्याने वाढत असून येणाऱ्या कालावधीमध्ये या व्यवसायामध्ये खूप मोठी संधी आहे. रिअल इस्टेट व्यवसायामध्ये भांडवलाची खूप मोठी गरज भासते. यामध्ये जर एखादा प्रकल्प तयार किंवा विकण्यापूर्वी पैशांची कमतरता भासत असेल तर ॲक्सिस बँक पाच वर्षाच्या कमीत कमी परतफेडी कालावधीत दीर्घकालीन कर्ज देते.

6- प्रोजेक्ट फायनान्स म्हणजेच प्रकल्प वित्त- दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि औद्योगिक प्रकल्पांकरिता प्रकल्प वित्त म्हणजेच प्रोजेक्ट फायनान्स देखील उपलब्ध आहे. अनेक स्टार्टअप्सना देखील या या सुविधेतून कर्ज पुरवठा बँकेच्या माध्यमातून केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe