मुळा, भंडारदारा व निळवंडे धरणांची वस्तुस्थिती माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष !

Published on -

मुळा धरण भरले नाही. लाभक्षेत्रातही पुरेसा पाऊस झालेला नाही. विहीरी व बोरच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

तर अशा अवस्थेत जिल्ह्यातल्या मुळा, भंडारदारा व निळवंडे धरणांची वस्तुस्थिती माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी

मुळा धरणातून २.१० टीएमसी पाणी सोडण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून तो अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.

आमदार शंकरराव पुढे म्हणाले की, समन्यायी कायद्यानुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेताना काही मध्यम मार्ग काढला पाहिजे

व तो निघत नसेल तर मुळा व भंडारदारा धरणातून पाणी सोडण्याऐवजी कालव्यांची कामे अपूर्ण असलेले निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. अशी जाहीर मागणी आपण यापुर्वी केली होती.

मात्र शासनाला चुकीची माहिती देऊन मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे अधिकाऱ्यांनी चुकीचा व एकतर्फी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.

मुळा व प्रवरा खोऱ्यातील पाणी सोडण्याबाबत आपल्यात वाद करत बसण्याऐवजी निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. हे धरण १०० टक्के भरलेले आहे. उजव्या तट कालव्यांची अपूर्ण कामे करण्यासाठी धरण भिंतीजवळ रिकामे करणे आवश्यक आहे.

त्यामुळे या कामासाठी धरण नंतर रिकामे करण्याऐवजी आजच पाणी सोडले. तर मुळा धरण ८५ टक्के भरलेले असताना या धरणातून पाणी सोडण्याची गरज पडणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याअभावी होणारे नुकसान टळेल.

मुळा, प्रवरा खोरे असा वाद आपल्यात करुन यात मराठवाडा आपले पाणी नेण्यास यशस्वी होते. ते आपल्याला होऊ द्यायचे नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe