लवकरच बाजारपेठेत येत आहे रॉयल एनफिल्डची ‘ही’ डॅशिंग बाईक! वाचाल वैशिष्ट्ये तर पडाल प्रेमात

Ajay Patil
Published:

Dashing bike : आजकालचे तरुणाई आणि बाईक यांचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या स्टाईलिश लुक आणि स्पोर्टी बाईकची तरुणाई मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते. अशा अनेक प्रकारच्या बाईक सध्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत.

परंतु या सर्व बाईकमध्ये जर आपण रॉयल एनफिल्डचा विचार केला तर सगळ्यात जास्त क्रेझ या बाईकची दिसते. गेल्या अनेक वर्षापासून रॉयल एनफिल्डने बाजारपेठेमध्ये दबदबा निर्माण केलेला आहे व तो टिकवून देखील ठेवलेला आहे.

अनेक डॅशिंग मॉडेल बाजारपेठेमध्ये रॉयल एनफिल्ड ने आतापर्यंत आणलेले आहेत व असेच आता रॉयल एनफिल्ड च्या हिमालयन बाईकची अनेक दुचाकी प्रेमी वाट पाहत होते. जे रॉयल एनफिल्डचे चाहते आहेत त्यांच्यासाठी आता या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

रॉयल एनफिल्डची हिमालयन बाईक लवकरच जागतिक बाजारपेठेत करणार पदार्पण

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनेक दिवसांपासून दुचाकी प्रेमी वाट पाहत असलेली रॉयल एनफिल्डची हिमालयन बाईक 2024 चे आता सात नोव्हेंबर 2023 रोजी जागतिक पदार्पण होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलेली आहे.

तसेच या बाईकची माहिती देखील आता उघड करण्यात आलेली आहे. साधारणपणे सध्या तिचा लूक आणि फीचर्स इत्यादी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरात लवकर संपणार आहे.

कशी आहे रॉयल एनफिल्डची हिमालयन बाईक?

या बाईकला समोर आणि मागील दोन्ही चाकामध्ये डिस्क ब्रेक असणार आहेत व ड्युअल चॅनल म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील असणार आहे. उत्तम ब्रेकिंग सुविधा असल्यामुळे नियंत्रणासाठी रायडरला खूप मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

तसेच यामध्ये समोर यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशोक युनिट असेल. त्यामुळे हा सस्पेन्शन सेटअप अधिक चांगला असण्याची देखील अपेक्षा आहे. तसेच या बाईकमध्ये राइड बाय वायर तंत्रज्ञान, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी व डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि सर्व एलईडी प्रकाश व्यवस्था असणार आहे.

महत्वाचे म्हणजे या बाईकमध्ये 1510mm लांब व्हील बेस आहे. हिमालयन 411 पेक्षा सुमारे 45 एमएम लांब आहे. या बाईकचे जर कर्ब वेट पाहिले तर ते 196 किलोग्रॅम आहे. रॉयल एनफिल्ड चे हिमालयनच्या पहिल्या मॉडेल पेक्षा या मॉडेलची इंधन टाकी थोडी मोठी असून चाकांची साईज पाहिली तर पुढची 21 इंच आणि मागची 17 इंचाची आहेत.

तसेच यामध्ये ट्यूबलेस टायर मिळणार असून बाईक मध्ये गोल आकाराचा एलईडी हेडलाईट, मोठ्या आकाराची टाकी तसेच मोठी विंडो स्क्रीन, स्प्लेट सिटिंग आणि कॉम्पॅक्ट टेल सेक्शन दिलेला आहे. या बाईकचा इंजिनचा विचार केला तर यामध्ये 451.66cc लिक्विड कुल्ड, चार व्हाल्व इंजन देण्यात आलेले असून हे इंजन सुमारे 39.57 बीएचपी आणि 40 ते 45Nm टॉर्क जनरेट करेल अशी एक अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe