Black Mamba Snake :- जगामध्ये अनेक सापाच्या प्रजाती असून त्यातील काही मोजक्याच जाती या विषारी आहेत. त्यातल्या त्यात विषारी जातींमध्ये देखील काही बोटावर मोजण्या इतक्या जाती अतिविषारी आहेत.
भारताचा विचार केला तर भारतामध्ये मन्यार, घोणस तसेच फुरसे, किंग कोब्रा आणि नाग यासारख्या जाती विषारी आहेत. परंतु जगातील सर्वात विषारी सापांचा विचार केला तर यामध्ये ब्लॅक मांबा ही जात अतिशय विषारी म्हणून समजली जाते.

ब्लॅक मंबा आहे जगातील सर्वात विषारी साप
विष तसेच वेग आणि चपळाईच्या बाबतीत एक विलक्षण अशी सापाची जात आहे. या जाती बद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. ब्लॅक मंबा आहे जगातील सर्वात विषारी साप.जगामध्ये सापाच्या अनेक जाती आढळून येतात.
त्यामध्ये काही सापांचे विष इतके भयंकर असते की काही क्षणात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु काही साप चावल्यानंतर देखील व्यक्ती जिवंत राहते.त्यामध्ये ब्लॅक मंबा हा जगातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जातो. प्राण्यांसाठी देखील या सापाचे विष खूप घातक आहे. आफ्रिकेमध्ये दरवर्षी वीस हजार लोक ब्लॅक मांबा सापाच्या चाव्यामुळे मरतात.
अतिशय चपळ असतो हा साप
ब्लॅक मांबा हा सर्वात चपळ साप म्हणून ओळखला जातो. वीस किलोमीटर प्रति तास वेगाने तो धावू शकतो. त्यामुळे जर हा साप समोर आला तर त्याला टाळणे म्हणजे खूप जिकिरीचे होऊन बसते. हा साप इतका आक्रमक असतो की त्याला थोडा जरी धोका जाणवला तरी तो काही सेकंदात दहा ते बारा वेळा चावा घेतो.
एक थेंब देखील मारण्यासाठी पुरेसा
एकाच चाव्यात चारशे मिलीग्राम विष हा चावा घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. विशेष म्हणजे या सापाच्या विषाचा एक थेंब देखील मारण्यासाठी पुरेसा ठरतो. जर ब्लॅक मांबा या जातीच्या सापाने चावा घेतला तर मृत्यूची 95 टक्के शक्यता असते.
रंगामुळे होते बऱ्याचदा फसवणूक
या सापाचे नाव ब्लॅक मांबा असल्यामुळे बऱ्याचदा आपल्या मनात विचार येतो की त्याचा रंग काळा असेल. परंतु हे साफ चुकीचे आहे. ब्लॅक मंबा या जातीच्या सापाचा रंग काळा नसून तो हलका तपकिरी, ऑलिव्ह ग्रीन आणि स्लेटी असतो. ब्लॅक मंबा सापाचे विष हे सर्वात वेगाने पसरणारे न्यूरो टॉक्सिन विष म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे. या सापाच्या चाव्यामुळे पंधरा मिनिटात व्यक्ती मरू शकते.