अहमदनगर ब्रेकिंग :11 दरोडेखोर जेरबंद, गावठी कट्टा..काडतुसे..गॅस कटर..तलवारी..; सर्वात मोठी कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 11 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. शनीशिंगणापूर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 53 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली की, राहुरी ते अहमदनगर रोडवरील शनीशिंगणापूर फाटा या ठिकाणी 10 ते 15 इसम दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेले आहेत.

याची खात्री करून त्यांनी तात्काळ पोलीस पथक त्यादिशेने रवाना केले. पथक त्याठिकाणी जाताच त्यांना अंधारात काही इसम बसलेले दिसले. पोलिसांची छापा टाकत धरपकड सुरु केली. त्यात 3 इसम फरार झाले. पोलिसांनी इतरांना ताब्यात घेतले.

हे आहेत आरोपी
राहुल किशोर भालेराव, संतोष सुखराम मौर्या, सागर विश्वनाथ पालवे, बबलु उर्फ दानिश शौकत शेख,आदिनाथ सुरेश इलग, रितेश सुरेश दवडे, दीपक महादेव साळवे, रमेश भाऊसाहेब वाकडे, प्रितमसिंह जगदिपसिंह ज्युनी, मिलींद मोहन सोनवणे, अविनाश कारभारी विधाते अशा ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दादा खंडु गांगुर्डे, शिवाजी मिठु शिंदे , संतोष शेषराव निकम हे फरार झाले.

जप्त केला मोठा मुद्देमाल

पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुस, तलवार,2 सुरे, चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, मिरचीपुड, स्विफ्टकार, अल्टोकार, युनिकॉन मोटार सायकल, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गॅसटाकी, गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर असा 8 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe