मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाथर्डी पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास खेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

१२ लाख ५ हजार ४४५ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खेडकर यांच्याकडे आढळली आहे. याप्रकरणी देविदास खेडकर यांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता संपादित केल्याबाबत नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खेडकर यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली.यावेळी २००१ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत

त्यांच्या सर्व ज्ञात कायदेशीर उत्पन्नातून मिळवलेली एकूण मालमत्ता व त्या कालावधीतील त्यांचा व त्यांचे कुटुंबीयांचा एकूण खर्च यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

त्यानुसार २०११ मध्ये खेडकर यांच्याकडे त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा १२ लाख ५ हजार ४४५ रुपये अधिक मालमत्ता आढळून आली.

या उत्पन्नाचा स्त्रोत सांगण्यात खेडकर पती-पत्नी अयशस्वी ठरल्याने या दोघा पती-पत्नीविरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment